आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामढी येथे चैतन्य कानिफनाथ यात्रेचा रविवारी, १२ रोजी रंगपंचमी यात्रेचा मुख्य दिवस आहे. कानिफनाथाचे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मढीचे बुंदी लाडू प्रसादाला मोठी मागणी असते. यात्रेची संभाव्य विक्रमी गर्दी लक्षात घेता लाडू विभाग दिवसरात्र काम करत असून भाविकांसाठी सुमारे दहा टनाचे लाडू तयार केले जातील, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष बबन मरकड यांनी दिली. कानिफनाथ यात्रेला होळीपासून सुरुवात झाली आहे. दोन टप्प्यात होणारी यात्रा यासाठी राज्याच्या विविध भागातून लाखो भाविक दर्शनासाठी मढी या ठिकाणी येत असतात. श्रीक्षेत्र मढी येथे चैतन्य कानिफनाथांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मढीचे बुंदी लाडू प्रसादाला मोठी पसंती असते. नाथांच्या दर्शनानंतर घरी जाताना भाविक येथिल लाडू प्रसाद अावर्जुन खरेदी करतात.
भाविकांची वाढती मागणी तसेच मढी यात्रेची होणारी गर्दी लक्षात घेता मढी देवस्थान समितीने तब्बल दहा टन लाडू निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवून दिवसरात्र काम सुरू आहे. भाविकांच्या आग्रहाखातर कोरोनामुळे दोन वर्षांपासून बंद पडलेला लाडूचा प्रसाद मात्र यंदाच्या वर्षी हा लाडूचा प्रसाद भाविकांना मिळणार आहे. बुंदी गाळपापासून ते लाडू पॅकिंग करण्याचे काम अतिशय वेगाने सुरू आहे. मढी देवस्थानचे अध्यक्ष बबन मरकड, उपाध्यक्ष सचिन गवारे, सचिव विमल मरकड, कोषाध्यक्ष भाऊसाहेब मरकड, विश्वस्त अर्जुन शिरसाठ, डॉ. विलास मढीकर, रवींद्र आरोळे, शामराव मरकड, सहसचिव शिवजित डोके यांच्यासह सर्वच विश्वस्त मंडळ यात्रा नियोजनासाठी रात्रंदिवस काम करत आहेत.
लाडू प्रसाद बनवण्याची संपूर्ण व्यवस्था केली जावून आवश्यक सामग्रीसह अन्नछत्रालय येथे लाडू बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. प्रसाद घरी इतरांना देण्यासाठी लाडू प्रसाद घेण्यासाठी भाविकांची चढाओढ असते. मढीला येणारे नाथ भक्त हावरी, गुळ रेवडी, गुलाब रेवडी, तिळगुळ, गुळाचा मलिदा, नारळ अशा विविध प्रकारचा प्रसाद नाथांसाठी अर्पण केला जातो. यात्रा उत्सवात याची मागणी जास्त असल्याने तसेच दोन वर्ष कोरोनाचे निर्बंध असल्यामुळे यात्रा उत्सव निर्बंध लादले गेले होते. यावर्षी मात्र कुठलेही निर्बंध नसल्याने लाडू प्रसादाला मोठी मागणी असल्यामुळे देवस्थान समितीने लाडू प्रसाद करण्याचे काम रात्रंदिवस सुरू आहे.
कोरोनानंतर प्रथमच लाडूप्रसाद केला सुरू
देवस्थानचे अध्यक्ष बबन मरकड म्हणाले, दरवर्षी लाडू प्रसादाचा होणारा तुटवडा लक्षात घेता संस्थानने लाडू निर्मितीकडे विशेष लक्ष दिले. भाविकांच्या आग्रहाखातर कोरोनामुळे दोन वर्षांपासून बंद पडलेला लाडूचा प्रसाद मात्र यंदाच्या वर्षी भाविकांसाठी माफक दरात दिला जाईल. एकूण भाविकांची गर्दी पाहता यंदा दहा टनाहून अधिक लाडू विक्री होईल, असा अंदाज आहे. यावेळी मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता वर्तवण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.