आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतकऱ्यांकडून शेतीपंपाच्या वीज बिलापोटी वसुली करून वीजपुरवठा बंद केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी पाथर्डी तालुक्यातील मिरी सबस्टेशनमधील अधिकाऱ्याची खुर्ची पेटून दिली. काही अज्ञातांनी महावितरणच्या कार्यालयातील खुर्ची टेबल तोडफोड केली. महावितरणच्या अधिकाऱ्यांसह राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. माजी ऊर्जामंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सरकारच्या भुमिकेविरोधात सबस्टेशनसमोर धरणे आंदोलन केले.
त्यानंतर अर्धा पाऊण तास उशिराने महावितरणचे अधिकारी पोहोचल्याने आमदार तनपुरेंसह उपस्थित शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मिरी, करंजी, तिसगाव येथील अधिकाऱ्यांना पूर्वकल्पना देऊनही ते मुद्दामून आंदोलनस्थळी उशिरा आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. रब्बी आणि खरीप हंगामाचे दोन्ही पीक अतिवृष्टीमुळे वाया गेले. यंदा शेतीतून उत्पन्न मिळाले नाही, अशा भावना पोपट घोरपडे, माणिक कराळे, सचिन होंडे या शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
दोन तासानंतरही पाथर्डी आणि नगरचे महावितरणचे अधिकारी शेतकऱ्यांच्या भावना समजून घेण्यासाठी येत नाहीत, म्हणून काही संतप्त शेतकऱ्यांनी सबस्टेशनच्या अधिकाऱ्यांची खुर्चीच जाळून टाकली. काही अज्ञातांनी कार्यालयातील टेबल खुर्च्याची तोडफोड केल्याने या ठिकाणचे वातावरण तणावपूर्ण बनले.
आमदार तनपुरे यांनी शेतकऱ्यांना व कार्यकर्त्यांना शांत करत शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली. यावेळी पंचायत समिती सदस्य राहुल गवळी, अमोल वाघ, अंबादास डमाळे, संतोष गरुड, राजेंद्र म्हस्के, रवींद्र मुळे, अजय पाठक, उद्धव दुसंगे, शिवाजी मचे, दिलीप वांढेकर, भीमराज सोनवणे, जालिंदर वामन, सरपंच सुधाकर वांढेकर, भागिनाथ गवळी, नागेश आव्हाड, माणिक लोंढे, जालिंदर गवळी, अशोक गवळी, आबासाहेब गवळी, मच्छिंद्र दारकुंडे, रामदास गोरे, पोपटराव आव्हाड, कुंडलिक मचे व शेतकरी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.