आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारी वृत:अधिकाऱ्यांना पोलिस ठाण्यातच शिवीगाळ ; कोतवालीतील प्रकार; चौघांविरुद्ध गुन्हा

नगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोतवाली पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांचा एकेरी भाषेत उल्लेख करतपोलिस ठाण्यातच सहाय्यक पोलिस निरीक्षकांना अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी पावणेसातच्या दरम्यान घडली. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोतवाली स्टेशनचे सहाय्यक फौजदार देवराम ढगे यांनी फिर्याद दिली. आरोपींमध्ये राहुल बत्तीन (वय २९, रा. शेरकर गल्ली, तोफखाना), सागर सोबले (वय २१, रा. कायनेटीक चौक), प्रशांत ढलपे (वय ३८, रा. चितळरोड) आणि अमित सावंत (वय ३६, रा. भराडगल्ली) यांचा समावेश आहे. आरोपींना नोटीस देण्यात देऊन त्यांची सुटका केल्याची माहिती तपासी अधिकारी उपनिरीक्षक इंगळे यांनी दिली. शुक्रवारी सायंकाळी आरोपी कोतवाली ठाण्याच्या ठाणे अंमलदार कक्षात आले. राहुल गवळी याच्याकडून मटक्याचे ८० हजार रुपये घेणे असून तो पैसे देत नाही, असे म्हणत त्यांनी आरडाओरड सुरू केली. आरोपींनी मद्यप्राशन केले होते. त्यांना सहाय्यक निरीक्षक रविंद्र पिंगळे आणि इतर कर्मचारी शांत करत होते. सपोनि पिंगळे बाहेर गेले असता राहुल बत्तीन याने त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. ढलपे याने निरीक्षक शिंदे यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला. पीआय शिंदेने आम्हाला येथे आणून बसवले असून त्यालाही पाहून घेऊ, असे म्हणत दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...