आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदी शिरीष टेकाडे तर सचिवपदी रमजान हवालदार यांची निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष राजेंद्र लांडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. यावेळी ३५० कौन्सिल सदस्य उपस्थित होते.
बी.पी. बोलगे, आबासाहेब कोकाटे, शिवाजीराव ढाळे, राजेंद्र लांडे, सुरेश पाटील, सर्जेराव मते यांची समिती स्थापन केली. सर्व इच्छुक नावांची छाननी करून चर्चेद्वारे एक मताने नवीन पदाधिकारी निवडण्यात आले. सभेने त्याला एकमताने मंजुरी दिली.
नवीन कार्यकारणी पुढील प्रमाणे - उपाध्यक्ष- सुदाम दळवी (पारनेर), मिलींद औटी (संगमनेर), भास्कर कानवडे (अकोले), बाळासाहेब पाचरणे (राहुरी), सहसचिव- बाबासाहेब थोरात (श्रीरामपूर), अरुण बोरनारे (कोपरगाव), प्रमोद तोरणे (राहता), कोषाध्यक्ष- अशोक सोनवणे (नेवासे), हिशोब तपासणीस- भालचंद्र देशमुख (कर्जत), अविनाश नेहुल (पाथर्डी). नूतन अध्यक्ष टेकाडे यांनी यापुढील काळात जुनी पेन्शन योजना, अंशतः अनुदानित शाळांचे प्रश्न, शिक्षणाधिकारी कार्यालयातील अनागोंदी, काही खासगी संस्थांकडून शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून शिक्षकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन सर्वांना विश्वासात घेऊन कार्य करू. कामकाज संघटनेच्या घटनेनुसार राहील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.