आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष:जुनी पेन्शन योजना चालू‎ करावी : संभाजी पवार‎

राहुरी9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎जुनी पेन्शन लागू करा, या‎ मागणीसाठी सरकारी, निमसरकारी‎ कर्मचारी, शिक्षक संघटना समन्वय‎ समितीचा १४ मार्च २०२३ पासून सुरू‎ होणाऱ्या बेमुदत राज्यव्यापी संपात‎ शिक्षक भारती संघटना सहभागी‎ होणार असल्याची माहिती शिक्षक‎ भारती संघटनेचे अध्यक्ष संभाजी‎ पवार यांनी दिली.‎ प्राचार्य चावरे यांना दिलेल्या‎ निवेदनात पवार यांनी म्हटले आहे‎ की, मुख्याध्यापक, शिक्षक व‎ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांंच्या‎ मागण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष‎ केले जात आहे.

सर्वांना जुनी पेन्शन‎ योजना लागू करणे, कंत्राटी‎ कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमन, रिक्त‎ पदे अग्रक्रमाने भरणे, चतुर्थ श्रेणी‎ कर्मचाऱ्यांची पदे निरासित करू‎ नये, शिक्षक, शिक्षकेतर‎ कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिक्लेम‎ योजना सुरू करणे, विनाअनुदानित‎ शाळांना शंभर टक्के अनुदान लागू‎ करणे अशा मागण्या प्रलंबित ठेवून‎ महाराष्ट्रातील शिक्षक व शिक्षकेतर‎ कर्मचाऱ्यांवर जाणीवपूर्वक अन्याय‎ करण्यात आला आहे, असे संभाजी‎ पवार यांनी निवेदनात म्हटले. या‎ निवेदनावर शिक्षक भारती संघटनेचे‎ राहुरी तालुका अध्यक्ष संभाजी‎ पवार, संतोष काळापहाड, रंगनाथ‎ मोटे, रविकिरण भांड, अस्लम‎ शेख, विष्णू गिरी, बाबासाहेब पटारे,‎ लक्ष्मण तमनर, रेखा आघाव,‎ ज्योती साळवे, एकनाथ फापाळे,‎ सुधाकर वाबळे, सुनील गाडेकर,‎ अनिल लोकरे, ऋषिकेश कातोरे,‎ सचिन घोडे, विजय वराळे,‎ वैजीनाथ वाघमारे, मनीषा कसोटे‎ यांच्या सह्या आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...