आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने नाताळ सुट्टी ,चालु वर्षाला निरोप न नवीन वर्षाचे स्वागत या निमित्ताने शिर्डी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेत साईमंदिर दि. ३१ डिसेंबर २०२२ रोजी रात्रभर भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवले जाणार असल्याची माहिती प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली.
दरवर्षी नाताळ सुट्टी, सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी देशाच्या विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने शिर्डीत येतात. शिर्डीत येणाऱ्या सर्व भाविकांना साईंच्या समाधीच्या दर्शनाचा लाभ मिळावा, संभाव्य गर्दीचे नियोजन योग्य रितीने व्हावे, या उद्देशाने शनिवार दि. ३१ डिसेंबर रोजी साईबाबा समाधी मंदीर दर्शनासाठी रात्रभर खुले असणार आहे. त्यामुळे ३१ डिसेंबर रोजीची शेजारती व दि. १ जानेवारी २०२३ ची पहाटेची काकड आरती होणार नाही.
तसेच नाताळ व नववर्षा निमित्त सुट्टीच्या गर्दीमुळे शनिवार दि. २४ डिसेंबर ते रविवार दि. १ जानेवारी २०२३ पर्यंत वाहन पुजा बंद राहतील. परंतु नाताळ सुट्टीच्या कालावधीत श्री साईसत्यवत पुजा, अभिषेक पूजा सूरू राहतील. मंदीर व परिसरात फटाके, वाद्य वाजवण्यास मनाई असून सुरक्षेच्या दृष्टीने शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन जाधव यांनी केले. हा महोत्सव यशस्विरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानचे सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभागांचे विभाग प्रमुख व सर्व कर्मचारी प्रयत्नशील आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.