आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जि. प. गट- गणांचा प्रारूप रचना आराखडा जाहीर:22 जूनला गट-गण रचनेच्या अंतिम आराखड्याला विभागीय आयुक्त मंजुरी देणार

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी गट -गण रचनेची प्रारूप अधिसूचना गुरुवारी (ता. 2) प्रसिद्ध झाली आहे. यावर 8 जूनपर्यंत नागरिकांच्या हरकती व सूचना मांडण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. अशी माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या 85 गटांचा व पंचायत समितींच्या 170 गणांचा आराखडा गेल्या महिन्यात 9 मे रोजी महसूल प्रशासनाने राज्याच्या निवडणूक आयुक्तांना सादर केला होता. त्यानंतर गुरुवारी जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या गट -गणांच्या प्रारूप रचनेचा आराखडा जाहीर झाला आहे.

हरकती व सूचना मागविण्यात येणार

या प्रारूप रचनेवर 8 जूनपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात येणार आहे. हरकती व सूचनांवर सुनावणी झाल्यानंतर 22 जून ला विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे गट व गण रचना अंतिम करणार आहेत. 27 जूनला गट - गण रचना प्रसिद्ध होणार आहे. दरम्यान नव्याने झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रारूप गट -गण रचनेत निंबळक गटाचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. तर नवनागापूरची नव्या गटात निर्मीती करण्यात आली आहे.तर जेऊर ,नागरदेवळे, दरेवाडी, चिंचोडी पाटील हे स्वतंत्र गट करण्यात आले आहेत.

नव्या इच्छुकांची मोर्चेबांधणी

अहमदनगर जिल्हा परिषदेच्या सदस्यांची मुदत मार्च महिन्यात संपली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. प्रशासक नियुक्तीमुळे जिल्हा परिषद निवडणूक देखील लांबणीवर पडली होती. आता प्रशासकीय स्तरावर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली असून, विद्यमान सदस्यांसह नव्या इच्छुकांनी देखील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

बातम्या आणखी आहेत...