आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक ठप्प:श्रावणी सोमवारनिमित्त वांबोरी घाटात दोन तास वाहतूक ठप्प

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त डोंगरण येथील यात्रा व मांजरसुंबा येथे गोरक्षनाथ गडावर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी होती. सकाळी दहा वाजल्यापासूनच या घाटांत वाहतूक कोंडीला सुरूवात झाली होती.

वाहतूक नियंत्रक यंत्रणाच उपलब्ध नसल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नगर तालुक्यातील डोंगरगण येथे यात्रेनिमित्त राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येतात. याच परिसरात हत्तीची मोट व गोरक्षनाथ गड असल्याने भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. त्याबरोबरच गर्भगिरीचा निसर्गरम्य परिसर व धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी घाटरस्त्यावरच वाहने उभी केली होती. त्यामुळे एकाचवेळी वाहनांची कोंडी झाली होती.

बातम्या आणखी आहेत...