आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र सरकारच्या इंधन दरवाढ विरोधात संगमनेर बसस्थानकासमोर रविवारी सकाळी युवासेनेने थाळी बजाओ आंदोलन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा निषेध करत घोषणाबाजी केली. शिवसेनेने आंदोलनात सहभाग नोंदवला. मागण्यांचे निवेदन शहर पोलिसांना देण्यात आले. युवासेना प्रमुख पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सचिव वरून देसाई यांच्या आदेशावरून युवासेनेचे जिल्हाप्रमुख अमित चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. युवासेना तालुकाप्रमुख राजू सातपुते, योगेश खेमनर, व्यापारी आघाडी प्रमुख संभव लोढा, विद्यार्थी सेना प्रमुख सचिन साळवे, कार्यालय प्रमुख बंडू म्हाळस, शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी, प्रसाद पवार, कार्याध्यक्ष दीपक साळुंके, संघटक पप्पू कानकाटे, इम्तियाज शेख, दिनेश फटांगरे, प्रथमेश बेल्हेकर यावेळी उपस्थित होते.
देशात पेट्रोल, डिझेल, गॅस आदी इंधन दरवाढीबरोबरच जीवनावश्यक वस्तूच्या किंमती गगनाला भिडल्याने सर्व साधारण नागरीकांचे महागाईने कंबरडे मोडले आहे. जनतेला अनेक अडचणींचा सामना रोजच्या जीवनात करावा लागत आहे. कामगार वर्गाला रोजंदारीत दोन वेळचे जेवण महाग झाले आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर महागाईमुळे जीवन जगणे मुश्किल झाले आहे. यामुळे जनता बेहाल झाली असून केंद्र सरकारने महागाई आटोक्यात आणावी. खोट्या आश्वासनांना नागरिक आता बळी पडणार नाही. आणि जनता सरकारला आता माफ करणार नाही, असे पदाधिकाऱ्यांनी भाषणात सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.