आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील २८ गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे.आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत असल्याने इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती. राज्य सरकारच्या सत्तांतरणांनंतर नगर तालुक्यातील ग्रामपंचायत ची ही पहिलीच निवडणूक आहे.सत्तांतरण होताच जनतेतून सरपंच निवडीचा निघालेला अध्यदेशाच्या अनुषंगाने ही निवडणूक पार पडत असल्याने तिला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. सरपंच जनतेतून असल्याने सदस्यांसाठी उमेदवार शोधताना गाव कारभाऱ्याना मोठी कसरत करावी लागत आहे.
या निवडणुकीनंतर पुढील वर्षाच्या सुरुवातीला बाजार समिती निवडणूक येत असल्याने तालुका पातळीवरून महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्याकडून स्थानिक कार्यकर्त्यांना रसद पुरविली जात आहे. नगर तालुक्यातील २८ ग्रामपंचायत मध्ये जिल्हा आणि तालुका पातळीवरील अनेक नेत्यांच्या गावात निवडणूका होत असल्याने त्यांचा खरा कस लागणार आहे. पुढील वर्षात बाजार समिती आणि पाठोपाठ जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक होणार असल्याने सर्वांचेच या निवडणुकांवर बारकाईने लक्ष असणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन पध्दतीने अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.त्यामध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि अर्ज दाखल करण्यासाठी राहिलेला अल्प कालावधी यामुळे ऑफलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारणे सुरू केल्याने मोठीच गर्दी वाढलेली आहे. आज शेवटच्या दिवशी सायंकाळी साडे पाचपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती.
नगर तालुक्यातील या गावांमध्ये आहे निवडणूक आठवड, खातगाव, टाकळी, पिंपळगाव लांडगा, राळेगण म्हसोबा, रांजणी, बाबुर्डी बेंद, पिंपळगाव कौडा, दहीगाव, कापूरवाडी, सारोळा कासार, शेंडी, सोनेवाडी (पि. ला.), आगडगाव, सोनेवाडी (चास), वडगाव तांदळी, मदडगाव, पांगरमल, उक्कडगाव, वाळकी, जखणगाव, कौडगाव, जांब, नारायणडोहो, नांदगाव, नेप्ती, साकत खुर्द, सारोळाबद्दी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.