आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमावास्या:आषाढ अमावस्यानिमित्त नगर शहरात उत्साहात दीपोत्सव साजरा

नगर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आषाढ महिन्यातील अमावास्या निमित्त नगर जिल्हा ब्राह्मण संघाच्या महिला आघाडीच्या वतीने कोर्टगल्ली येथील सुयोग मंगल कार्यालयात शेकडो पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. जिल्हा ब्राह्मण संघाचे अध्यक्ष किशोर जोशी यांच्या संकल्पनेतून राबविलेल्या उपक्रमाचा शुभारंभ ज्येष्ठ महिलांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाला.

यावेळी महिला आघाडीच्या जिल्ह्याध्यक्ष सुपर्णा देशमुख, शहर अध्यक्षा प्रिया जाणवे यांच्यासह मोठ्या संख्येने विविध क्षेत्रतिल महिला उपस्थित होत्या. श्री, स्वस्तिक, कमळ या धार्मिक चिन्हांचे आकार करुन येथे पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या. श्री गोंदवलेकर महाराजांच्या आरतीने महिलांनी दिवे लावले. तसेच विठ्ठल - रुख्मीणींची आरती करण्यात आली.

यावेळी किशोर जोशी म्हणाले, आषाढ महिन्यातील आमवस्येला दीपपुजन अत्यंत पवित्र मानले जाते. लाखो वर्षांपासून आपली ही परंपरा चालू आहे. परंतु अलीकडे या पवित्र दिवसाला गटारी आमवस्या म्हणून बदनाम केले जात आहे. म्हणूनच दीप पुजनाचे महत्त्व असलेल्या या शुभ दिवसाबद्दल जागृती व्हावी आपली संस्कृती जपावी या उद्देशाने हा दीपोत्सव साजरा केला. यावेळी ब्राह्मण संघाच्या महिला आघाडीच्या संगीता कुलकर्णी, श्रेया देशमुख, सुचिता कुलकर्णी, सुवर्णा महापुरुष, स्नेहल धर्माधिकारी, रोहिणी पुंडलिक, सविता तागडे उपस्थित होत्या.

बातम्या आणखी आहेत...