आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी सायंकाळी ७.३० वाजता शहरातील जाणता राजा मैदान येथे आनंद, मिलिंद, आदर्श व उत्कर्ष शिंदे यांच्या उपस्थितीत ‘शिंदेशाही बाणा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नामदार बाळासाहेब थोरात मित्र मंडळने दिली.
आमदार बाळासाहेब थोरात सर्वसामान्यांचे नेते व सुसंस्कृत नेतृत्व म्हणून राज्यभर लोकप्रिय आहेत. विधानसभेत सलग ८ वेळा निवडून येतमंत्रिमंडळात महसूल, कृषी, शालेय शिक्षण, पाटबंधारे, रोजगार हमी योजना, खारजमीन, राजशिष्टाचार, जलसंधारण आदी विभागांची खाती सांभाळली. महसूल विभागाला हायटेक बनवताना ‘लिमका बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद केली.
शालेय शिक्षण विभागात ‘बेस्ट ऑफ फाईव्ह’चा निर्णय तर कृषी विभागात एक लाख शेततळ्यांची निर्मिती त्यांनी केली. काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे ते सदस्य असून महाराष्ट्र विधिमंडळ पक्षाचे ते नेते आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी अत्यंत प्रभावी काम करताना राज्यात काँग्रेसला पुन्हा भरारी दिली. जिल्ह्याला वरदान ठरणारे निळवंडे धरण पूर्ण करून कालव्यांची कामे मार्गी लावली. त्यांचा वाढदिवस राज्यात स्फूर्ती दिन म्हणून साजरा होत असून संगमनेर तालुक्यात ७ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्त ‘शिंदेशाही बाणा’ हा राज्यातील लोकप्रिय कार्यक्रम प्रसिद्ध गायक आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, आदर्श शिंदे व उत्कर्ष शिंदे यांच्या उपस्थितीत अनमोल गीतांचा नाजराणा सादर होणार आहे. जाणता राजा मैदानावर कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असून मोठ्या संख्येने संगमनेर तालुक्यातील जनतेने उपस्थित राहावे, असे आवाहन नामदार बाळासाहेब थोरात मित्र मंडळाने केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.