घरी परतण्यासाठी दोन जण ट्रकला पाठीमागून लटकले; व्हिडिओ व्हायरल, पोलिसांकडून वाहनाचा शोध सुरू

  • वाहनच न मिळाल्याने या दोन युवकांनी ट्रकला पाठीमागून लटकून प्रवास केला

प्रतिनिधी

Mar 26,2020 09:59:00 AM IST

अहमदनगर - कोरोना व्हायरस प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात २१ दिवसांची संचारबंदी लागू केल्यानंतर शहरांत राहणारे युवक मिळेल त्या वाहनांनी घरी गावाकडे परतत आहेत. अशाच दोन युवकांचा धावत्या ट्रकला पाठीमागून लटकून सुरू असलेला जीवघेणा प्रवास एका व्हिडीओद्वारे समोर आला आहे. पोलिसांनी याबाबत शोध माेहिम सुरू केली आहे.


सुरुवातीला ३१ मार्चपर्यंत राज्यात संचारबंदी राहील, असे जाहीर करण्यात आले होते. मंगळवरी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यात आणखी २१ दिवस वाढ करत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे अनेकांमध्ये घबराट पसरली शहरांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थी व युवकांनी मिळेल त्या वाहनाने गावाकडे जाणे पसंत केले.


पोलिसांनी खासगी वाहने रस्त्यावर येऊ न दिल्याने आणि त्यांनी मालट्रक टेम्पो यातून प्रवास करण्याचा प्रयत्न केला. परंतु वाहनच न मिळाल्याने या दोन युवकांनी एका ट्रकला पाठीमागून लटकून प्रवास केला. त्यांच्या पाठोपाठ दुसऱ्या वाहनातून प्रवास करत असलेल्या काही जणांनी हा व्हिडीओ मोबाईलमध्ये चित्रीत केला आहे.

X