आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदनगर शहरात अस्वच्छता, खड्डेयुक्त रस्ते ही मोठी समस्या आहे. असे असतानाही नगर शहराला शहर सौंदर्यीकरणाचा पाच कोटी रुपयाचा पुरस्कार दिला गेला. हा पुरस्कार कशाच्या आधारावर आणि कुठल्या भागाचे निरीक्षण करून दिला? असा सवाल जागरूक नागरिक फोरमने मंत्रालयाला केला आहे.
प्रत्यक्षात नगरमधील स्वच्छतेची व गटारीची बिकट अवस्था आहे. शहरातील समस्यांचे वास्तव तपासण्यासाठी मंत्रालयातील प्रामाणिक अधिकारी नगरमध्ये सरप्राइज व्हिजीटला पाठवावेत, अशी मागणी जागरूक नागरीक फोरमचे सुहास मुळे यांनी केली आहे.
मुळे म्हणाले की, महापौरांनी देखील महानगरपालिकेतील कामचुकार अधिकाऱ्यांची किती वाईट अवस्था आहे, याची कल्पना दिली आहे. हे अधिकारी खरंच पगाराइतके काम करतात का, वार्डनिहाय कधी आढावा घेतात की नाही? याचे पोस्टमार्टम होणे गरजेचे आहे.
आपण मंत्रालयातून पाठवलेला रस्ते, पाणी, गटारीसाठीचा निधी, स्वच्छतेचे दिलेले खोटे पुरस्कार आणि प्रत्यक्षात असलेली वाईट परिस्थिती याची कल्पना तपासणी केल्यावर येईल. नगर शहराचे आपत्ती व्यवस्थापनच कसे आपत्तीग्रस्त आहे, हेही समोर येईल. याचा गांभीर्याने विचार करावा, असेही जागरूक नागरिक फोरम मंचच्या वतीने निवेदनात म्हटले आहे.शहरातील अस्वच्छतेचे वास्तव दर्शविणारे चित्र सुहास मुळे यांनी सादर केले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.