आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थोरात-विखे:‘पदवीधर’साठी जिल्ह्यात पुन्हा एकदा थोरात-विखे संघर्षाची ठिणगी

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक पदवीधर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. काँग्रेसकडून विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे तर भाजपकडून महसूल मंत्री डॉ. राजेंद्र विखे यांच्या नावाची चर्चा आहे. डॉ. तांबे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे आहेत तर डॉ. राजेंद्र विखे हे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचे बंधू आहेत. दरम्यान, या निवडणुकीच्या माध्यमातून जिल्ह्यात पुन्हा एकदा थोरात-विखे संघर्षाला नवी झळाळी प्राप्त होण्याची शक्यता आहे. नाशिक, जळगाव, धुळे ,नंदुरबार अहमदनगर या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघ यापूर्वी भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे.

या मतदारसंघातून प्रा. ना. स. फरांदे तीन वेळा निवडून आले होते. त्यानंतर फरांदे विधान परिषदेची सभापती व उपसभापती देखील झाले होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत प्रताप सोनवणे निवडून आले होते. त्यानंतर प्रताप सोनवणे लोकसभेत गेल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत हा मतदारसंघ काँग्रेसकडे गेला होता. त्यावेळी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे निवडून आले होते. अडीच वर्ष पदवीधरचे आमदार डॉ. तांबे होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत डॉ. तांबे पुन्हा निवडून आले होते. आता या मतदारसंघासाठी रणधुमाळी सुरू झाली आहे.

काँग्रेसकडून विद्यमान आमदार डॉ.तांबे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. भाजपकडून मात्र नव्या उमेदवाराचा शोध सुरू आहे. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना शह देण्यासाठी विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचे बंधू डॉ. राजेंद्र विखे या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी नगरमधून भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा नाशिक विभागाचे बुथ अभियानाचे संयोजक प्रा. भानुदास बेरड, शिक्षक परिषदेचे नाशिक विभाग अध्यक्ष तथा मुख्याध्यापक

संफडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे घेणार निर्णय
पूर्वी नाशिक पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला होता. गेल्या साडेसात वर्षापासून या मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व आहे. राज्यात शिंदे -फडणवीस यांचे सरकार आहे. नगर जिल्ह्याचे प्रभारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. भाजपकडून उमेदवारी कोणाला द्यायची याचा निर्णय फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे घेणार आहेत.घाचे राज्य उपाध्यक्ष सुनील पंडित इच्छुक आहेत, तर धुळे जिल्ह्यातील धनराज विसपुते इच्छुक आहेत.

बातम्या आणखी आहेत...