आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीजचोरी:सव्वाचार लाखांच्या वीजचोरी प्रकरणी‎ एकास दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा‎

नगर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कंपनीतील वीज मीटरमध्ये छेडछाड‎ करून वीज चोरी केल्याप्रकरणी‎ पाराजी नारायण रोकडे (रा. निंबळक‎ ता. नगर) याला २ वर्ष सक्तमजुरी‎ आणि १५ हजार रूपये दंडाची शिक्षा‎ जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस.‎ गोसावी यांनी ठोठावली. अ‍ॅड. उज्वला‎ थोरात-पवार यांनी सरकारतर्फे काम‎ पाहिले.‎ पाराजी नारायण रोकडे याची‎ एमआयडीसीमध्ये अजित फुड्स‎ नावाची कंपनी आहे.

वीज कंपनीचे‎ सहायक अभियंता किरण हरी महाजन‎ तसेच रमाकांत भागचंद गर्जे व इतर‎ कर्मचारी आणि पंचांनी ८ नोव्हेंबर‎ २०२६ रोजी दुपारी दोन वाजता अजित‎ फुड्स कंपनीमधील वीज जोडणीची‎ तपासणी केली. रोकडे याने वीज‎ जोडणी मीटरमधील दोन स्टड कापून‎ वीज मिटरमध्ये छेडछाड करून वीज‎ चोरी करत असल्याचे समोर आले.‎ वीज मिटरची चाचणी केली असता, ४‎ लाख २४ हजार २८० रूपये किमतीची‎ ३४ हजार १२९ युनिट वीज चोरी‎ केल्याचे आढळून आले. किरण‎ महाजन यांच्या फिर्यादीवरून‎ आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला.‎

खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे पाच‎ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये‎ फिर्यादी, पंच साक्षीदार, तांत्रिक‎ अधिकारी यांच्या साक्षी नोंदविण्यात‎ आल्या. रोकडेविरूध्द गुन्हा सिध्द‎ झाल्याने त्याला शिक्षा ठोठावण्यात‎ आली. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे‎ अंमलदार प्रबोध हंचे, धुमाळ यांनी‎ पैरवी अधिकारी म्हणून सहकार्य केले.‎

बातम्या आणखी आहेत...