आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीगोंदा येथून घेतले ताब्यात:राज्यभरात शाखा असलेल्या नगर अर्बन बँकेच्या 150 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी एकास अटक

अहमदनगर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरात शाखा असलेल्या नगर अर्बन बँकेच्या 150 कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी सचिन दिलीप गायकवाड (रा. श्रीगोंदा) याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज सायंकाळी श्रीगोंदा येथून ताब्यात घेत अटक केली आहे. या गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक आव्हाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

नुकताच न्यायालयाने आरोपी गायकवाडचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला होता. बँक बचाव कृती समितीचे प्रमुख व बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी 17 फेब्रुवारी 2022 रोजी नगर अर्बन बँकेचे तत्कालीन चेअरमन, संचालक मंडळ, वरिष्ठ अधिकारी व 28 संशयास्पद कर्जदारांचे कर्ज खाते, तत्कालीन चेअरमनचे निकटचे कार्यकर्ते सचिन गायकवाड व आशुतोष लांडगे यांच्याविरुद्ध 150 कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू

दरम्यान फिर्यादी गांधी यांनी त्यांच्याकडील पुरावे न्यायालयासमोर मांडल्याने आरोपी गायकवाड याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दरम्यान, गायकवाड याच्या अटकेमुळे इतर आरोपी व संशयास्पद कर्ज खातेदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

नगर अर्बन बँकेसंदर्भात चिल्लर घोटाळा, सोनेतारण कर्ज घोटाळा व इतर कर्ज घोटाळे, कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी यापूर्वी नगर व पुणे जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत. त्यात यापूर्वी अनेक प्रतिष्ठितांना जेलची वारी करावी लागली आहे. आता नव्याने दाखल गुन्ह्यात किती जणांवर कारवाई होणार, याकडे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...