आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटक:‘अर्बन’च्या 150 कोटींच्या घोटाळा प्रकरणी एकास अटक ; पोलिस निरीक्षक आव्हाड यांच्या पथकाने केली कारवाई

नगर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर अर्बन बँकेच्या १५० कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी सचिन दिलीप गायकवाड (रा. श्रीगोंदा) याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी श्रीगोंदे येथून अटक केली. तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक आव्हाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. नुकताच न्यायालयाने आरोपी गायकवाडचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला होता. बँक बचाव कृती समितीचे प्रमुख व बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी १७ फेब्रुवारी रोजी नगर अर्बन बँकेचे तत्कालीन चेअरमन, संचालक मंडळ, वरिष्ठ अधिकारी व २८ संशयास्पद कर्जदारांचे कर्ज खाते, तत्कालीन चेअरमनचे निकटचे कार्यकर्ते सचिन गायकवाड व आशुतोष लांडगे यांच्याविरुद्ध १५० कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणी कोतवाली ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी गांधी यांनी त्यांच्याकडील पुरावे न्यायालयासमोर मांडल्याने आरोपी गायकवाडचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला होता. यानंतर आर्थिक गुन्हेच्या पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...