आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्निशामक केंद्र:एक कोटी रुपयांच्या अग्निशामक केंद्र आणि निवासासाठी 24 गुंठे जागा नगरपंचायतीला ; मतदार संघाची एक वेगळी ओळख

कर्जत19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विकासाच्या माध्यमातून कर्जत-जामखेड मतदार संघाची एक वेगळी ओळख निर्माण होते आहे. प्रसाद ढोकरीकर यांच्या कुटुंबियांनी विकासकामांसाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्यांमुळे विकासाचा वेग निश्चित वाढल्याशिवाय राहणार नाही. असे प्रतिपादन कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी केले. कर्जत येथे अग्निशामक दल केंद्र आणि निवासस्थानासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्याचे भूमिपूजन समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कर्जतच्या नगराध्यक्षा उषा राऊत, उपनगराध्यक्षा रोहिणी घुले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, उपाध्यक्ष प्रवीण घुले, माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, गटनेते संतोष मेहेत्रे, उपगट नेते सतीश पाटील, नगरसेविका छाया शेलार, ज्योती शेळके, मोनाली तोटे, लंका खरात, मनीषा सोनमाळी आणि प्रसाद ढोकरीकर आणि कुटुंबीय यांच्यासह आदि उपस्थित होते. यावेळी आमदार पवार म्हणाले की, ढोकरीकर कुटुंबीयांनी अग्निशामन आणि इतर प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देणे विकासाला निश्चितच चालना मिळेल. हे सर्व करीत असताना मूलभूत समस्यांकडे आपल्याला लक्ष द्यायचे आहे. कर्जतची सुधारित पाणी योजना असेल त्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. तसेच एमआयडीसीचा प्रस्ताव सचिवयांचे कडे गेलेला आहे. एक बैठक होऊन तो लवकरच मंजूर होईल. या ठिकाणी उद्योग आले पाहिजे यासाठी रस्तेही चांगले असले पाहिजे. यासाठी पवार साहेब यांच्या माध्यमातून अजित पवार यांचे माध्यमातून नामदार नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून महामार्ग मंजूर केले आहेत. तसेच श्री संत सदगुरूगोदड महाराज यांची ग्रंथसंपदा संपूर्ण राज्यात आणि देशात पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. असे आमदार रोहित पवार म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...