आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाच महिने रोहित्र बंद असूनही वीज वितरण कंपनी मागील पाच महिन्यांच्या वीज बिलासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करत आहे. त्यामुळे एक हजार रुपये प्रति शेतकरी याप्रमाणे वीज बिल वसूल करावे, या मागणीसाठी राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहटा यांनी श्रीगोंदे तहसील कार्यालयासमोर उपोषण केले. मात्र अधिकाऱ्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी आणि सिंगल फेज लाईट सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण सोडले.
तालुक्यातील शेतकऱ्यांचा वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अंत पाहू नये. या प्रश्नावर तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविली असून लोकप्रतिनिधींना भविष्यात याची किंमत मोजावी लागेल, असे सांगत नाहटा यांनी मढेवडगाव येथील वीज उपकेंद्रात बिल भरण्यासाठी शेतकरी गेले असता अधिकारी शेतकऱ्यांशी उद्धटपणाने वागत असल्याचा आरोप केला.
दोन दिवसात वीज पूर्ववत करावी अन्यथा ११ तारखेला वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात मोठे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा यावेळी नाहटा यांनी दिला. यावेळी प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार मिलिंद कुलथे, पुरुषोत्तम लगड, जयराज लगड, किरण जगताप यांच्यासह कंपनीचे अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.