आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगरमध्ये निर्जळी:शहरासह उपनगरात बुधवारी पाणी नाही; एक दिवस उशिराने होणार पुरवठा

अहमदनगर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहर आणि उपनगरात बुधवारी एक दिवस उशिराने पाणीपुरवठा होणार आहे. पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्ती कामासाठी हा शटडाऊन घेतला आहे. त्यामुळे नगर शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगर भागात एक दिवस उशिराने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेने दिले आहे.

तांत्रिक देखभाल दुरुस्ती

महावितरण व महापारेषण कंपनीकडून ट्रान्समिशन लाईनच्या तातडीच्या तांत्रिक देखभाल दुरूस्ती कामासाठी सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत शटडाउन असणार आहे. या वेळेत महानगरपालिकेमार्फत पाणीपुरवठा योजनेवरील दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. दरम्यानच्या काळात मुळानगर, विळद, येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार असून, पाणी वितरणाच्या टाक्या भरता येणार नाहीत.

येथे गुरुवारी पाणी

बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सुर्यनगर, निर्मलनगर, तसेच स्टेशन रोड, आगरकर मळा, विनायकनगर परिसर, मुकुंदनगर, केडगाव, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर या भागास सकाळी 11 नंतर पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. येथे गुरुारी पाणीपुरवठा होईल.

येथे शुक्रवारी पाणी

गुरुवारी रोटेशननुसार पाणी वाटप असलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागातील सर्जेपुरा, सिध्दार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, आनंदी बाजार, कापड बाजार, पंचपीर चावडी, जुने मनपा कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर, स्टेशन रोड, विनायकनगर, स्टेशन रोड, आगरकर मळा, कायनेटीक चौक परिसर व सावेडी या भागात शुक्रवारी पाणी पुरवठा होईल.

येथे शनिवारी पाणी

मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, म्युनिसीपल हाडको या भागात शुक्रवारी पाणीपुरवठा होणार नसून तो शनिवारी करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...