आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आष्टी:तुरीला पाणी देत असताना बिबट्याचा हल्ला, आष्टीत एकाचा मृत्यू, शासनाकडून 15 लाखांची मदत जाहीर

आष्टी(प्रतिनिधी)2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मागील महिन्यातच बिबट्याने तीन बालकांवर हल्ला करून ठार केले होते.

शेतात तुरीला पाणी देत असताना बिबट्यांने अचानक हल्ला केल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. नागनाथ गर्जे असे या हल्ला झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. गेल्या एक महिन्यापासून तालूक्यात बिबट्याचा वावर आहे. मागील महिन्यातच बिबट्याने तीन बालकांवर हल्ला करून ठार केले होते.

एक बिबट्या वनविभागाला पकडण्यात यश आले आहे. परंतु मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास सुरूडी पंचायत समिती गणाच्या सदस्या अशा गर्जे यांचे पती नागनाथ गर्जे (वय 36) हे आपल्या शेतातील तुरीला पाणी देत होते. यावेळी अचानक बिबट्याने हल्ला केला. दुपारच्या दरम्यान शेजारील लोकांना ओरडण्याचा आवाज आला. माञ, लोकांनी त्यांच्याकडे दुर्लेक्ष केले. परंतु राञी साडेसहा वाजले तरी नागनाथ हे घरी आले नाही. तसेच फोनही उचलत नसल्याने त्यांना शोधण्यासाठी गेले तर तेथे त्यांचा मृतदेह आढळला. त्यानंतर त्यांचा मृतदेह आष्टी येथील ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. शवविच्छेदन करून राञी उशीरा त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले.

गर्जेंच्या कुटुंबियांना शासनाच्या वतीने 15 लाख रुपयांची मदत जाहीर

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात सुर्डी आणि परिसरात वावरणाऱ्या बिबट्याला तातडीने जेरबंद करण्यासाठी विशेष पथके नेमावी व या भागात नागरिकांमध्ये पसरलेली भीती व दहशत तातडीने संपवावी असे निर्देश बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी विभागीय वनाधिकाऱ्यांना दिले आहेत. या घटनेबद्दल मुंडे यांनी दुःख व्यक्त केले असून, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास देण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या योजनेनुसार मयत गर्जे यांच्या कुटुंबियांना रोख पाच लाख रुपये व त्यांच्या पाल्यांच्या नावे मुदत ठेव (एफडी) दहा लाख असे एकूण 15 लाख रुपये देण्याचेही धनंजय मुंडे यांनी जाहीर केले आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser