आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:सौताडा घाटात ट्रक कार अपघातात एक जखमी

जामखेड25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामखेड जवळील सौताडा घाटात सिमेंटचा ट्रक एम एच ४४, ९९४४ आणि व्हॅगनार कार एमएच १२, ८१६१ या वाहनांचा शुक्रवारी रात्री ११ वाजता अपघात झाला. या अपघातात कारमध्ये अडकलेल्या महेश विद्याधर देशमुख, रा. बीड यांना तीन तासानंतर जेसीबी व क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आले,तर इतर कुटुंबातील व्यक्तींना नागरिकांनी सुखरूप बाहेर काढले.

खड्ड्यामुळे अपघात झाला अपघात एवढा भीषण होता की व्हॅगनार गाडीवर सिमेंटची गाडी पडली होती व व्हॅगनार गाडीतील चालक असलेले महेश देशमुख वय वर्ष ४४ बीड यांच्या गाडीवर सिमेंट गाडी पडल्यामुळे ते तब्बल तीन तास अडकून होते. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी रुग्णवाहिका घेऊन सौताडा घाटात धाव घेतली व ट्रक कार अपघातातील एका व्यक्तीस सर्वांनी तीन तास प्रयत्न करुन बाहेर काढले. यावेळी देशमुख किरकोळ जखमी झाले. यातील बीड येथील महेश देशमुख जखमी झाले, पत्नी मंजू महेश देशमुख वय ४०, त्रिविद महेश देशमुख वय यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...