आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील अरणगाव दुमाला येथील दिवटे वस्तीवर १३ मार्च रोजी मध्यरात्री ५ते ६ जणांनी सशस्रदरोडा घातला.दरोडेखाेरांच्यामारहाणीत कल्याणमच्छिंद्र गायकवाड(वय ४२) यांचा मृत्यूझाला. दरोडेखोरांनीगायकवाड यांच्याघरातून पाच हजार रुपये, सोन्याच्या दागिन्यांसह ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
सविस्तर माहिती अशी : श्रीगोंदे तालुक्यातील बेलवंडी पोलिस ठाण्याअंतर्गत अरणगाव दुमाला येथील दिवटे वस्तीवर कल्याण गायकवाड यांच्या राहत्या घरात १३ मार्चला मध्यरात्री ५ ते ६ दरोडेखोरांनी प्रवेश केला. दमदाटी व मारहाण करीत त्यांनी कल्याण गायकवाड यांच्या पत्नीच्या गळ्यातील, तसेच मुलीच्या कानातील सोन्याचा ऐवज हिसकावून घेतला.
नंतर घरातील रोख ५ हजार रुपये घेतले. यावेळी कल्याण गायकवाड यांनी दरोडेखोरांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी गायकवाड यांच्यावर प्रतिहल्ला करीत टणक हत्याराने जबर मारहाण केली. त्यात डोक्याला गंभीर जखम झाल्याने, रक्तस्त्राव होऊन गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बेलवंडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह मोठा फौज फाटा दिवटे वस्तीवर हजर झाला. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. मृत कल्याण गायकवाड यांचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी श्रीगोंदे येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.
अरणगावचे ग्रामस्थ संतापले
दिवटे वस्ती येथील दरोडा व खुनाचा तपास लागत नाही, तोपर्यंत गायकवाड यांचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा अरणगाव येथील नागरिकांनी घेतला. त्यामुळे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला होता. त्यात बेलवंडी पोलिस ठाण्यात गेल्या एकाच महिन्यात तीन पोलिस निरीक्षक बदलल्याने पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये ताळमेळ नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे बेलवंडी पोलिस स्टेशनअंतर्गत गुन्ह्याचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.