आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अहमदनगर:एक रिपोर्ट पाॅझिटिव्ह तर दुसरी निगेटिव्ह, तरुणाने थेट मुख्यमंत्र्यांनाच पाठवले पत्र

अहमदनगर3 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

महानगर पालिकेकडून रॅपीड टेस्ट केल्यानंतर नगरच्या एका तरुणाला कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचा अहवाल देण्यात आला. त्यानंतर तरूणाने जिल्हा रूग्णालयात तपासणी केल्यानंतर मात्र, अहवाल निगेटिव्ह आल्याचा खुलासा थेट मुख्यमंत्र्याना पाठवलेल्या पत्रात या तरुणाने केला आहे. या प्रकारामुळे तपासणींच्या अहवालाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

नगर शहरातील २४ वर्षीय तरुणाने पत्रात म्हटले आहे की, नगर शहरातील काटवन खंडोबा मंदिर परिसरात रहिवासी असलेल्या तरूणाने २१ आॅगस्टला सायंकाळी ४ वाजता चितळे रस्त्यावरील एका केंद्रात तापसणी केली. या तपासणीनंतर १० मिनिटांनी मला कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. पण तेथे प्रत्येकालाच पाॅझिटिव्ह असल्याचे सांगितले जात असल्याचा संशय आला. त्यानुसार मित्राच्या सल्ल्याने जिल्हा रूग्णालयात तातडीने कोरोना तपासणीसाठी स्वॅब दिला. २३ आॅगस्टला या तपासणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर या तरूणाने २४ आॅगस्टला पुन्हा रॅपिड टेस्ट केली तर ती टेस्ट पुन्हा पाॅझिटिव्ह आली. त्यामुळे तरूणाने मी पाॅझिटिव्ह आहे की निगेटिव्ह असा संभ्रम तयार झाला. हा प्रश्न तरूणाने थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्राद्वारे विचारला आहे. जनतेची लूट होत असून आपण यात लक्ष घालून रॅपिड टेस्ट बंद करावी, अशी मागणीही तरूणाने केली आहे.
तरूणाने दिव्य मराठीशी बोलताना सांगितले की, मला मनपाच्या आरोग्य विभागाने कारवाईचा इशारा देत शासकीय तंत्रनिकेत येथे उपाचासाठी दाखल केले आहे. जर मी निगेटिव्ह असेल तर येथील पाॅझिटिव्ह रूग्णांमुळे मला बाधा होऊ शकते अशी भिती या तरूणाने व्यक्त केली.

दुसऱ्या तपासणीची गरज नाही

जर अॅटिजन तपासणी केली असून त्यात जर रिपोर्ट पाॅझिटिव्ह असेल तर दुसरी तपासणी करण्याची गरज नाही. आम्ही पाॅझिटिव्ह आल्यानंतर संबंधित रूग्णाला उपचारासाठी आम्ही दाखल केले आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे आम्ही उपचारासाठी दाखल केले आहे. डाॅ. अनिल बोरगे, आरोग्य अधिकारी, मनपा.