आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुमच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देऊ, त्यासाठी मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांशीही चर्चा करेन. एखाद्याला कायमचे संपवून टाकण्यापर्यंतचे राजकारण कोणीही करू नये, असे प्रतिपादन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले.
पाथर्डी तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या मुंडे नगरहून पाथर्डीकडे जात असताना देवराई येथे निवडणुकीच्या कारणावरुन ठार झालेल्या अजय गोरख पालवे या तरुणाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी अजय पालवेची आई संजिवनी व आजी बबई पालवे यांचा आक्रोश पाहून पंकजा यांनाही अश्रू अनावर झाले. माझा मुलगा आता कधीही दसरा मेळाव्याला सावरगावला येणार नाही, अशा शब्दात वडील गोरख पालवे यांनी हंबरडा फोडला.
मुंडे यांनी पालवे कुटुंबांला धीर देत ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले. यावेळी खासदार सुजय विखे, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, माजी सभापती संभाजी पालवे, माजी उपसभापती भरत पालवे, अॅड सतीश पालवे आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.