आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:व्यवहाराच्या नैराश्येतून एकाची आत्महत्या; पोलिस ठाण्यात तीघांविरूद्ध गुन्हा दाखल

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

व्यवहाराच्या नैराश्येतून तसेच पैशांची मागणी केल्यानंतर होत असलेल्या दमदाटीला कंटाळून एकाने आत्महत्या केली. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात तीघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेंद्र दामोदर सोनवणे (रा. केडगाव) असे मयताचे नाव आहे. या संदर्भात मयताची पत्नी कौशल्या सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परमेश्वर मारूती विधाते उर्फ मामा, सुनील रामदास घेंबुड आणि अनिल बाबा लोंढे (सर्व रा. केडगाव) यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत राजेंद्र सोनवणे केडगाव परिसरात वास्तव्यास होते. सेंट्रींगचे काम करून उदरनिर्वाह करत होते. आरोपी विधाते, घेंबुड आणि लोंढे यांच्याकडून सोनवणे यांना काम मिळत असे. या कामाचे पैसे सोनवणे यांना दर मंगळवारी आरोपी देत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आरोपी सोनवणे यांना कमी पैसे देत होते. तसेच, पैशांची मागणी केल्यानंतर दमदाटी करत होते. या नैराश्येतून मयत सोनवणे यांनी १ जूनच्या मध्यरात्री राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी मृत सोनवणे यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. पोलिसांनी पंचनाम्यादरम्यान चिठ्ठी ताब्यात घेतली. सहाय्यक निरीक्षक रविंद्र पिंगळे तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...