आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहाता बाजार समितीत कांद्याला मिळाला 2200 रुपयांपर्यंत भाव:11549 कांदा गोण्यांची आवक, कांद्याच्या भावात तीनशे रुपयांची वाढ

अहमदनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (2 ऑक्टोबर) 11 हजार 549 कांदा गोण्यांची आवक झाली होती. यावेळी झालेल्या लिलावात एक नंबरच्या कांद्याला सर्वाधिक प्रतिक्विंटल 1700 ते 2200 रुपये भाव मिळाला. तर दोन नंबरच्या कांद्याला प्रतिक्विंटल 1150 ते 1650 रुपये भाव मिळाला.

तर यावेळी 4 हजार 129 क्रेट डाळिंबाची आवक झाली होती. यावेळी एक नंबर डाळिंबाला 131 ते 200 रुपये भाव मिळाला, अशी माहिती राहाता बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली. दरम्यान, राहाता बाजार समितीत मागील दीड महिन्यानंतर प्रथमच कांद्याच्या भावात 300 रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले.

जोड कांद्याला किती भाव

राहाता बाजार समितीत रविवारी 11 हजार 549 कांदा गोण्यांची आवक झाली होती. यावेळी झालेल्या लिलावात एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 1700 ते 2200 रुपये भाव मिळाला. दोन नंबरच्या कांद्याला प्रतिक्विंटल 1150 ते 1650 रुपये, तीन नंबरच्या कांद्याला प्रतिक्विंटल 400 ते 1100 रुपये, तर गोल्टी कांद्याला प्रतिक्विंटल 900 ते 1200 रुपयांपर्यंत भाव मिळाला. जोड कांद्याला प्रतिक्विंटल 100 ते 400 रुपये भाव मिळाला.

कांद्याच्या भावात वाढ

दरम्यान, मागील दीड महिन्यात प्रथमच कांद्याच्या भावात 300 रुपयांनी वाढ झाल्याचे दिसून आले. कित्येक दिवसानंतर कांद्याच्या भावात वाढ झाल्याचे दिसून आले.

डाळिंबाची 4129 क्रेट आवक

राहाता बाजार समितीत रविवारी 4 हजार 129 क्रेट डाळिंबाची आवक झाली होती. यावेळी झालेल्या लिलावात एक नंबर डाळिंबाला प्रतिकिलो 131 ते 200 रुपये भाव मिळाला. दोन नंबरच्या डाळिंबाला प्रतिकिलो 91 ते 130 रुपये, तीन नंबरच्या डाळिंबाला 46 ते 90 रुपये, तर चार नंबरच्या डाळिंबाला 10 ते 45 रुपये भाव मिळाला. मागील आठवडाभरापासून राहाता बाजार समितीत डाळिंबाचे भाव अपवाद वगळता स्थिर आहेत, अशी माहिती राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...