आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन गंडा:विजबिलाच्या नावाखाली महिलेला पन्नास हजारांचा ऑनलाइन गंडा

नगर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वीज बिल भरा अन्यथा कनेक्शन कट केले जाईल, असे खोटे सांगून एका महिलेच्या खात्यातून ४९ हजार ९९९ रुपये वेळोवेळी काढून घेण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. आपली फसवणूक झाल्याचे संबंधीत महिलेच्या लक्षात येताच त्यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन मोबाईल नंबरधारक अनोळखी व्यक्तींविरूध्द गुन्हा केला आहे. रविवारी दुपारी ही घटना घडली.

भिंगार शहरातील जामखेड रोडवर राहणाऱ्या ५३ वर्षीय फिर्यादी महिलेला रविवारी दुपारी फोन करून ‘तुमचे इलेक्ट्रीसिटीचे बिल भरले नाही, तुमचे कनेक्शन कट केले जाईल, तुम्ही भरलेले मागील महिन्याचे बिलही अपडेट झाले नाही, कृपया करून आपण इलेक्ट्रीसिटीला संपर्क साधा, असे एका व्यक्तीने सांगितले. यानंतर त्या व्यक्तीने फिर्यादीच्या मोबाईल नंबरवर मेसेज पाठवून दोन अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. फिर्यादीने मोबाइलमध्ये अ‍ॅप डाऊनलोड करताच समोरील व्यक्तीने फिर्यादीच्या बँक खात्यातून वेळोवेळी ४९ हजार ९९९ रूपये काढून घेत फसवणूक केली. पोलिसांनी दोन मोबाईल नंबरवरील अनोळखी व्यक्तींविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...