आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारवर प्रभावशाली दबावगट:मनसेच्या ऑनलाईन प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

नगर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दूरदृष्टीने महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी मनसे सैनिक प्रयत्नशिल आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले पाहिजे, त्यांच्यासाठी योजना आखल्या गेल्या पाहिजे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, यासाठी सरकारवर एक प्रभावशाली दबावगट म्हणून मनसे काम करत आहे, असे प्रतिपादन शहर सचिव डाॅ. संताेष साळवे यांनी केले.

मनसेने नागरिकांच्या प्रश्नांसाठी नेहमीच आवाज उठवला आहे. त्यातून अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. त्यामुळे मनसेविषयी लोकांमध्ये विश्वास आहे. युवकही मनसेमध्ये दाखल होत आहेत. मनसेचे कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचूव त्यांना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाद्वारे पक्षाशी जोडण्याचे काम सुरु असल्याचे डॉ. साळवे म्हणाले.या अभियानाचा शुभारंभ जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांच्या उपस्थित करण्यात आला. याप्रसंगी शहर सचिव डॉ. संतोष साळवे, शहर उपाध्यक्ष तुषार हिरवे, संदिप चौधरी, गणेश शिंदे आदि उपस्थित होते. याप्रसंगी सचिन डफळ म्हणाले, मनसेच्या धडाकेबाज नेतृत्वामुळे नागरिकांच्या अडचणी सोडविल्या जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...