आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइनचा घोळ:ऑनलाइन ‘सर्व्हर डाऊन’चा सर्वसामान्यांना मनस्ताप! ; अन्न-सुरक्षा योजनेतील लाभार्थींची होईना ऑनलाइन नोंदणी

नगर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरकारी कामात पारदर्शकता यावी, सर्वसामान्यांचा वेळ वाचावा या हेतूने सरकारी कार्यालयातील बहुतांशी कामे ऑनलाईन झाली असताना याच ऑनलाइन प्रणालीचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा योजनेतील नव्या लाभार्थींची नोंदणी नोव्हेंबरपासून सर्व्हर डाऊन असल्यामुळे होत नाही. परिणामी नगर शहरासह जिल्ह्यातील अन्नसुरक्षा योजनेतील नव्या लाभार्थींना अन्नधान्यापासून वंचित राहावे लागत आहे. तीच परिस्थिती जात पडताळणी समिती कार्यालयाचीही आहे. “सरकारी काम आणि चार महिने थांब’यापासून सर्वसामान्यांची मुक्तता व्हावी यासाठी आठ वर्षापासून राज्य सरकारच्या विविध योजना तसेच अन्य शासकीय कामकाज ऑनलाइन सुरू केले आहे. पंधरा वर्षांपूर्वी सर्व शासकीय कार्यालयात अधिकाऱ्यांसमोर असलेल्या फाइल्सच्या ढिगाऱ्याऐवजी कर्मचारी व अधिकाऱ्यांसमोर लॅपटॉप अथवा संगणक लावले आहेत. महसूल, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा पुरवठा विभाग, जिल्हा जात पडताळणी समिती यासह शासकीय कार्यालयातील बहुतांश काम हे ऑनलाइन झाले आहे. ऑनलाईन कामकाजामुळे सर्वसामान्यांसह प्रशासकीय स्तरावर असलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांचा वेळ वाचत होता. आता मात्र याच ऑनलाइन प्रणालीचा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे. शासकीय कार्यालयातील बहुतांशी विभागांतील सर्व्हर गेल्या काही महिन्यांपासून डाऊन होत असल्यामुळे कामकाज करताना अडथळे निर्माण होत आहेत. नागरिकांना वेळेवर दाखले, प्रमाणपत्र व योजनांचा लाभ मिळत नाही. जिल्हा पुरवठा विभागाने आरसीएम संकेतस्थळ डाऊन होत असल्यामुळे अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाला पत्र देऊन अडचणींचा पाढा वाचला आहे.

जात प्रमाणपत्र वेळेवर मिळेनात नुकतेच परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. पुढच्या शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारे जात पडताळणी प्रमाणपत्र घेण्यासाठी विद्यार्थी व पालक ऑनलाईन नोंदणी करतात. मात्र ऑनलाइन नोंदणी झाल्यानंतर जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालयातून हे प्रमाणपत्र ऑनलाइन दिले जाते मात्र काही दिवसांपासून या कार्यालयातील सर्व्हर डाऊन झाले आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना प्रमाणपत्र वेळ मिळत नाहीत.

सर्व्हरडाऊन बाबत तीन वेळा पत्र दिले ^ जिल्हा पुरवठा विभागामार्फत अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी केली जाते. मात्र नोव्हेंबर महिन्यापासून सर्व्हरचा वेग अत्यंत कमी असल्यामुळे ही नोंदणी करण्यासाठी अडचणी येत आहेत. सर्व्हर डाऊन बाबत आम्ही तीन वेळा प्रशासकीय स्तरावर पत्रव्यवहार केला आहे.'' जयश्री माळी, जिल्हा पुरवठा अधिकारी, नगर.

अन्नसुरक्षातील लाभार्थी

{ अन्नसुरक्षा योजनेतील एकूण लाभार्थी- ६ लाख ८९ हजार { कुटुंब संख्या- ३० लाख ६७ हजार { अंत्योदय रेशन कार्डधारक- ८७ हजार { अंत्योदय कुटुंब संख्या-४ लाख २८ हजार { प्राधान्य रेशन कार्डधारक-६ लाख १६ हजार { प्राधान्य कुटुंब संख्या-२६ लाख ३९ हजार { सर्व्हर डाऊनमुळे- ५ हजार जणांची नोंद नाही

जात पडताळणी प्रमाणपत्र वितरण { आतापर्यंत ऑनलाईन प्रमाणपत्र : ३६ हजार { ऑफलाइन : २ हजार { सर्व्हर डाऊन होण्यापूर्वी आठवड्याला : ६०० प्रमाणपत्र { सर्व्हर डाऊन झाल्यानंतर आठवड्याला: ४०० प्रमाणपत्र

बातम्या आणखी आहेत...