आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12.88 कोटी माफ:केवळ 12,131 थकबाकीदारांनीच घेतला मनपाच्या शास्तीमाफीचा लाभ; सवलत काळात 18.56 कोटींची कर वसुली

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मनपा प्रशासनाने महिनाभर दिलेल्या शास्तीमाफी योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. सुमारे ९६ हजार थकबाकीदारांपैकी केवळ १२ हजार १३१ थकबाकीदारांनीच या योजनेचा लाभ घेतला. सवलत काळात महापालिकेच्या तिजोरीत १८.५६ कोटींची भर पडली असून, त्यासाठी तब्बल १२.८८ कोटींवर महापालिकेला पाणी सोडावे लागले. दरम्यान, महापालिकेची चालू वर्षातील एकूण वसुली ३९.३५ कोटींवर पोहचली आहे.

मालमत्ता कर व पाणीपट्टीची थकबाकी २०० कोटींवर पोहोचल्याने महापालिका आर्थिक अडचणीत सापडली आहे. थकबाकीमध्ये सुमारे १०० कोटी रुपयांच्या शास्तीच्या रकमेचा समावेश आहे. त्यामुळे महापालिकेने शास्ती माफ करावी, जेणेकरून वसुलीचे प्रमाण वाढेल, अशी मागणी करण्यात आली होती. आयुक्त पंकज जावळे यांनीही वसुलीला चालना मिळावी, या उद्देशाने इतिहासात प्रथमच १०० टक्के शास्ती माफ केली. महापालिकेच्या थकबाकी पैकी ३१.४४ कोटींची वसुली सवलत काळात झाली आहे. त्यापैकी १२.८८ कोटींची शास्तीची रक्कम महापालिकेने माफ केली आहे. त्यामुळे मनपाकडे प्रत्यक्ष १८.५६ कोटी रुपये वसूल झाले आहेत. इतिहासात प्रथमच संपूर्ण शास्ती माफ केल्यामुळे मोठ्या प्रमाणात वसुली होईल, अशी अपेक्षा महापालिकेला होती. मात्र, ही अपेक्षा फोल ठरली आहे. दरम्यान, शास्ती माफीमुळे चालू वर्षात ३१ ऑगस्टअखेर ३९.३५ कोटींच्या वसुलीची नोंद झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...