आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर नागरिकांमध्ये सुरक्षात्मक उपाय योजनांबाबत बेफिकीरी वाढली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील अवघ्या ४.२ टक्के नागरिकांनीच बुस्टर डोस घेतला आहे. जिल्ह्यात कोव्होव्हॅक्ससह कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसच्या १ लाख २५ हजार ८० मात्रा, शिल्लक आहेत. लसीकरणाला गती देण्यासाठी जिल्हा परिषदेने ६० वर्षावरील नागरिकांना १०० टक्के बुस्टर डोस देण्याचे अभियान हाती घेतले आहे.
जिल्ह्यात नव्याने १३ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात लसीकरण मोहिमेंतर्गंत १८ ते ४५ वयोगटातील ७७.५ टक्के तरूणांनी पहिला, ५९ टक्के दुसरा तर १.१ टक्के तरूणांनी बुस्टर डोस घेतला. ४५ ते ६० वयोगटातील ८४.२ टक्के पहिला, ७०.३ टक्कें दुसरा तर २.६ टक्के नागरिकांनी बुस्टर डोस घेतला. ६० वर्षावरील नागरिकांनी १०२ टक्के पहिला तर ८२.६ टक्केंनी दुसरा डोस घेतला. बुस्टर घेण्याचे सरासरी प्रमाण अवघे ४.२ टक्केच आहे. ‘दिव्य मराठी’ने माहिती घेतली असता, जिल्ह्यात कोविशिल्डचे १७ हजार २१० तर कोव्हॅक्सिनचे ६१ हजार १५० डोस शिल्लक आहेत.
जिल्ह्यात १९ महिन्यांत ५६ लाख ८६ हजार डोसच्या मात्रा
१६ जानेवारी २०२१ पासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेंतर्गंत जिल्ह्यात आजअखेर १९ महिन्यांत ५६ लाख ८६ हजार ८४६ डोस देण्यात आले. त्यात सर्वाधिक ३०लाख ८३ हजार पहिला तर २४ लाख ५१ हजारांचा दुसरा डोस देण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेकडून बुस्टर डोसला मिळणार ‘अमृत’
जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी अमृत पंधरवाड्याचे आयोजन केले आहे. जिल्ह्यात ६० वर्षावरील ४ टक्के नागरिकांनी बुस्टर डस घेतला आहे. हे प्रमाण १०० टक्के करण्याचे उद्दिष्ट येरेकर यांनी आरोग्य विभागाला दिले आहे.
एक्सपायर झाल्याच नाही
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात आवश्यकतेनुसार लसची मागणी केली जाते. गरजेइतक्याच लस उपलब्ध केल्या जात असल्याने आजतागायत एकही लस एक्सपायर झाली नसल्याची नोंद आहे. सध्या उपलब्ध साठ्याचीही मुदत किमान वर्षभर संपणार नाही.
कोराेनाची सद्यस्थिती अशी
राज्यात २ जुलै ते १ ऑगस्ट या सात दिवसांत सरासरी १ हजार ८९१ नवीन रूग्णवाढ झाली आहे. मार्च २०२२ ते मेअखेरपर्यंत कोरोना रूग्णांची संख्या कमालीची घटली होती. परंतु, जून व जुलै महिन्यात पुन्हा एकदा रूग्णवाढ होतानाचे चित्र आहे. अहमदनगर जिल्ह्यात एका दिवसांत ६४ नवे रूग्ण आढळून आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.