आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची रणधुमाळीत शिक्षक नेत्यांनी तालुकानिहाय बैठका व मेळावे आटोपल्यानंतर इच्छुकांचे उमेदवारी अर्ज भरून घेण्याची लगीनघाई सुरू आहे. अर्ज ताब्यात आल्यानंतरच सर्वच मंडळे युती-आघाडीसाठी पायघड्या घालणार आहेत. परंतु, वैचारिक मतभेद असलेले मंडळ ज्यांच्याबरोबर जाईल, त्यांच्या विरोधात आघाडी करण्याचीही व्युव्हरचना आखण्यात आली आहे.
जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या २१ जागांसाठी २४ जुलैला मतदान होणार आहे. १७ जूनपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी सुमारे ७१९ अर्ज विक्री झाली असून ५ अर्ज दाखल झाले. बँकेच्या राजकारणात रोहोकले प्रणित गुरूमाऊली मंडळ, तांबे गटाचे गुरूमाऊली, गुरूकुल, सदिच्छा मंडळांच्या नेत्यांनी जय्यत तयारी सुरू केली. चार ते साडेचार हजार मतांचा टप्पा गाठण्यासाठी सर्वच मंडळांनी युती-आघाडीचा पर्याय खुला ठेवला आहे. तत्पुर्वी तालुकानिहाय मेळावे व बैठका आटोपण्यात आल्या आहेत.
आता तातडीने मतदारसंघनिहाय इच्छुकांचे अर्ज शिक्षक नेते दोन दिवसांत जमा करून घेणार आहेत. अर्ज ताब्यात आल्यानंतरच युती-आघाडीच्या बैठकांचा सपाटा सुरू होईल. स्वराज्य, एकल संघटनेचे समता, ऐक्य, इब्टाचे बहुजन मंडळ, आबा जगतापांची संघटना, शिक्षक भारती संघटना यांना बरोबर घेण्यासाठी प्रमुख मंडळांमध्ये रस्सीखेच पहायला मिळत आहे. जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी, फोनवर संपर्क साधून ‘चाय पे चर्चा’ रंगतदार होत आहेत. सध्यातरी कोणतेही मंडळ वर्ज्य नसल्याचे शिक्षक नेते खासगीत बोलताना दिसत आहेत. परंतु, दोन मोठ्या मंडळांनी युती केली तर त्यात दोन्ही मंडळांचे नुकसान होऊन नाराजी वाढण्याचा धोका आहे. त्यापेक्षा लहान मंडळांची गोळाबेरीज करण्यावरच भर दिला जात आहे. दरम्यान, गुरूकुल मंडळाचे रा. या. औटी यांनी जिल्ह्यातील मेळावे आटोपले असून सोमवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले.
“त्यांनी’ ओढल्या आयत्या पीठावर रेघा सभासदांसमोर आम्ही रोहोकले गुरूजींचा साडेतीन वर्षांचा कालावधी व त्यांच्याशी इतरांनी केलेली गद्दारी मांडणार आहोत. आम्ही व्याज कमी करण्याचे धोरण घेतले होते. बँकेची घडी आम्ही बसवली, पण काहींनी आयत्या पीठावर रेघा ओढल्या.'' संजय शेळके, रोहोकले प्रणित गुरूमाऊली मंडळ.
एका दिवसांत ७१९ अर्ज जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी येत्या २४ जुलैला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी शुक्रवारी पहिल्याच दिवशी ७१९ अर्जांची विक्री झाली असून पाच अर्ज दाखल झाले आहेत. दाखल करण्याची मुदत २३ जूनपर्यंत असल्याने मंडळांची धावपळ सुरू आहे.
भिती नाही म्हणून कोणाशीही युती नाही ^ आम्ही केलेले कामच सभासदांसमोर मांडणार आहोत. आम्ही बँक सुस्थितीत आणली, म्हणूनच ‘भिती नाही, म्हणून युती नाही’, या निश्चयावर ठाम आहोत. पहिल्या साडेतीन वर्षात पावटक्के व्याजदर कमी झाला. ज्यांनी ना परतावा पाचशे घेतले, त्यांच्याकडे कारभाराचे ज्ञान नाही. बापू तांबे, गुरूमाऊली.
रोहोकलेंनी दिलेले शब्द पाळले नाहीत ^ बँकेचा कारभार एक टक्क्यांत करण्याचा आमचा मानस आहे. मागीलवेळी रावसाहेब रोहोकलेंनी सांगितले होते, एक टक्क्यात कारभार करू किंवा भत्ते घेणार नाही. पण ते तसे करू शकले नाहीत. आम्ही मात्र, एक टक्क्यांत टशकारभार करून दाखवू. बँक ताब्यात असताना आम्हीच स्वभांडवली केली.'' राजेंद्र शिंदे, नेते, सदिच्छा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.