आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा:निम्म्या मालमत्ताधारकांनीच भरला महापालिकेचा कर; 59 कोटींचा कर जमा, 25 टक्केच करवसुली

नगर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील आर्थिक वर्षात महापालिकेला मालमत्ता कर व पाणीपट्टी पोटी केवळ ५९ कोटी रुपयांची वसुली करण्यात यश आले आहे. मागील वर्षातील एकूण मागणी पैकी फक्त २५ टक्केच वसुलीची नोंद झाली असून निम्म्या मालमत्ताधारकांनीच कर भरल्याचे समोर आले आहे. महापालिकेला ७० कोटींचे उद्दिष्टही गाठता आले नाही.

नगर शहरातील १ लाख २० हजार मालमत्ताधारकांकडे २४० कोटी ९३ लाख रुपयांची थकबाकी होती. त्यात १९१.९१ कोटी रुपये जुनी व ४९ कोटी रुपये चालू वर्षाची मागणी होती. यापैकी ५९ कोटी ४८ लाख रुपयांची वसुली करण्यात महापालिकेला यश आले आहे. शास्ती माफी योजनेत ४ कोटी रुपयांची सूट दिल्यामुळे ५४.५४ कोटी रुपयेच मनपाच्या तिजोरीत जमा झाले आहेत. झालेल्या वसुलीमध्ये २७.४४ कोटी जुनी व २७.१० कोटी चालू मागणीपैकी वसूल झाले आहेत. चालू मागणीपैकी निम्मीच वसुली झाल्यामुळे यंदाही केवळ पन्नास टक्केच मालमत्ताधारकांनी भरल्याचे स्पष्ट झाले आहे. वर्षभरातील २४० कोटींच्या मागणीपैकी केवळ २५ टक्केच वसुली झाल्यामुळे चालू वर्षात थकबाकी पुन्हा अडीचशे कोटीवर पोहचण्याची चिन्हे आहेत.

बातम्या आणखी आहेत...