आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाळाने आपल्याला विविध कालखंडात फिरवून आणले आहे. सध्या आपण अंधारलेल्या भ्रमयुगात आहोत. हा अंधार दूर करण्यासाठी शिक्षकांनी मशाल हाती घ्यावी, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी केले.
गुरुकुल महिला आघाडी व शिक्षक समितीच्या सयुंक्त विद्यमाने गुरुकुल नारीशक्ती व उत्कृष्ट शाळा पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. आमदार मोनिका राजळे पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी लोककवी प्रशांत मोरे, प्रा. डॉ. सुधाकर शेलार, कवी राजेश्वर शेळके, शिक्षकनेते डॉ. संजय कळमकर, रा. या. औटी, वृषाली कडलग, नितीन काकडे, सुदर्शन शिंदे, इमाम सय्यद, राजेंद्र ठाणगे, सीताराम सावंत, भास्कर नरसाळे, आदी उपस्थित होते.
संविधान ही भवितव्याची किल्ली असून ही किल्ली शिक्षकांच्या हातात आहे. या भ्रमयुगात जबाबदार माणसे असत्य बोलत आहे. शिक्षक व साहित्यिकांनी सत्य सांगण्याची भूमिका पार पाडली पाहिजे. गुरुकुल मंडळ नारीशक्तीचा सन्मान करते, ही बाब सुखावणारी असल्याचे सासणे यांनी सांगितले.
आमदार राजळे म्हणाल्या, महिला शिक्षिका प्रपंच सांभाळून ज्ञानदानाचे काम करत आहेत. गुरुकुलने त्यांना पुरस्कार देवून काम करण्याची प्रेरणा दिली. अनेक उपक्रमातून गुरुकुलने शिक्षकांची समाजात प्रतिष्ठा वाढवली, असे सांगितले. लोककवी प्रशांत मोरे यांच्या आईवरील कविता, राजेश्वर शेळके यांनी गायिलेली लेक नावाची हृदयस्पर्शी कविता, प्रा. सुधाकर शेलार यांचे सावित्रीबाई फुले यांच्यावरील भाष्य आणि संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांच्या भाषणामुळे शिक्षकांना प्रती साहित्यसंमेलन अनुभवायला मिळाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.