आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समारंभ:नगरमध्ये मंगळवारी खुली मानांकन बुद्धिबळ स्पर्धा ; नरेंद्र फिरोदिया यांची माहिती

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक बुद्धिबळ संघटना व अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेने जिल्हा चेस सर्कलच्या वतीने प्रथमच अखिल भारतीय मानांकन बुद्धीबळ स्पर्धा मंगळवारी (८ नोव्हेंबर) सकाळी ११ वाजता बडिसाजन मंगल कार्यालय, स्टेशन रोड, येथे होणार आहे, अशी माहिती राज्य बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष तथा जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी दिली.

पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत अनेक खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ १२ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता होणार आहे, अशी माहिती उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी यांनी दिली. जिल्ह्यात प्रथमच अखिल भारतीय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली आहे. साडेचार वर्षांचा पार्थ शिंदे (पुणे) हा सर्वात लहान खेळाडू तर ८२ वर्षांचे रामटेके (नागपूर) हे या स्पर्धेचे विशेष आकर्षण असणार आहे.

या स्पर्धेतील विजेत्यांना ३१ हजार रुपयांची रोख पारितोषिक मिळणार आहे, असे सचिव यशवंत बापट यांनी सांगितले. नऊ वर्षाखालील खेळाडूंना, महिलांना, जेष्ठांना व विनामानांकित खेळाडूंना सुध्दा रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत प्रमुख पंच म्हणून प्रविण ठाकरे (जळगांव), सहाय्यक पंच पारुनाथ ढोकळे (नगर) हे काम पाहणार आहेत. या स्पर्धेत मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, गुजरात, तमिळनाडू तसेच पुणे, जळगांव, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, मुंबई येथील एकूण १५० खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. स्पर्धा यशस्वीतेसाठी पारुनाथ ढोकळे, सुबोध ठोंबरे, शाम कांबळे, प्रकाश गुजराथी, देवेंद्र ढोकळे, चेतन कड, मनिष जसवानी आदि प्रयत्नशील आहेत. तरी ही रोमांचकारी स्पर्धा पाहण्यासाठी नगरकरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा बुद्धिबळ संघटनेने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...