आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतीसाठी कर्ज पुरवठा:प्रकल्पग्रस्तांना शेती कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा ; शेतकऱ्यांनी मानले आमदार आशुतोष काळे यांचे आभार

कोपरगाव15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील पूर्व भागातील अनेक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर पुनवर्सन कायदा लागू अशा आशयाचा फेर येत असल्यामुळे अशा शेतकऱ्यांना सोसायटी व सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतीसाठी कर्ज पुरवठा केला जात नव्हता. त्या शेतकऱ्यांनी श्रीसाईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आशुतोष काळे यांच्याकडे आपली कैफियत मांडून येत असलेल्या आर्थिक अडचणी सांगितल्या होत्या. त्याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून पुनवर्सन कायदा लागू अशा आशयाचा फेर येत असलेल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.

कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील येसगाव, ब्राम्हणगाव, गोधेगाव, घोयेगाव, आपेगाव, तळेगाव मळे, कासली, पढेगाव, धोत्रे, खोपडी, लौकी आदी गावातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी नांदूर मध्यमेश्वर एक्सप्रेस कालव्यामध्ये गेल्या आहेत. त्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर पुनवर्सन कायदा लागू अशा आशयाचा फेर लावण्यात आला. त्यामुळे या शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्यांप्रमाणे सोसायटी व सहकारी बँकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा होत नव्हता. त्याबाबत आमदार आशुतोष काळे यांनी तहसीलदार विजय बोरुडे यांच्या समवेत बैठक घेतली होती.

सहकार व महसूल खाते, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा केला होता. नांदूर मध्यमेश्वर कालवा अभियंता यांच्याशी चर्चा करून जिल्हा बँकेकडे देखील त्यांचा पाठपुरावा सुरू होता. त्या पाठपुराव्यातून अखेर ही आर्थिक कोंडी दूर करण्यात आमदार आशुतोष काळे यांना यश आले. त्याबाबत नुकतेच जिल्हा बँकेने लेखी पत्र देऊन ज्या शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर पुनवर्सन कायदा लागू अशा आशयाचा फेर लावण्यात आला, त्या शेतकऱ्यांना शेतीसाठी सहकारी सोसायट्यांना कर्ज देण्याच्या सूचना केल्या आहेत. ते लेखी पत्र गोधेगव आणि घोयेगाव सोसायटीच्या सचिवांना दिले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील येसगाव, ब्राम्हणगाव, गोधेगाव, घोयेगाव, आपेगाव, तळेगाव मळे, कासली, पढेगाव, धोत्रे, खोपडी, लौकी गावच्या ग्रामस्थांनी आमदार काळे यांचे आभार मानले आहेत.

बातम्या आणखी आहेत...