आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:शाश्वत विकासासाठी अभियंत्यांना संधी

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक शांती व समृद्धीसाठी १७ शाश्वत विकास लक्ष २०३० पर्यंत साध्य करण्याचे लक्ष घेतले आहे. त्यासाठी पाणी, खनिज, पर्यायी इंधन, हरित ऊर्जा, सोलर ऊर्जा, प्रदुषण नियंत्रण जलशुद्धीकरण क्षेत्रात मानव साधनाची कमतरता आहे.

त्यात अभियंत्यांना व कामगारांना संधी उपलब्ध आहेत, असे प्रतिपादन अभियंता राजेंद्र कुमार सराफ यांनी केले. द इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सच्या अहमदनगर केंद्राच्या स्थापनादिनिमित्त ‘पर्यावरण व पाणी क्षेत्रातील नोकरीच्या संधी’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मार्गदर्शन करताना सराफ बोलत होते. प्राचार्य डॉ. वाय. आर. खर्डे यांनी प्रास्ताविक केले. केंद्राचे सचिव अभय राजे यांनी कार्याची माहिती दिली,

बातम्या आणखी आहेत...