आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभा निवडणुक:श्रीगोंदे तालुक्यातील तरुणाई खेचण्यासाठी नागवडेंकडून आदेश पुढे

अंकुश शिंदे | श्रीगोंदे12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या २ विधानसभा निवडणुकांमधून ऐनवेळी घ्यावी लागलेली माघार, प्रसंगी घेतलेल्या वेगवेगळ्या भूमिका, या वेळ जाताच राजेंद्र नागवडे यांच्याच अंगलट आल्या. आगामी विधानसभा निवडणुकीत राजेंद्र नागवडे यांनी सवतासुभा मांडण्याचे ठरवले आहे. युवकांमध्ये वातावरण निर्मिती करण्याची आदेश नागवडे यांची प्रगल्भ होत असलेली हातोटी नागवडे गटाला युवा वर्गात स्थान निर्माण करून देणारी ठरत आहे. हीच बाब हेरुन गेल्या अनेक दिवसांपासून आदेश नागवडे यांना पुढे करत राजेंद्र व दीपक या दोन्ही बंधूंनी अनुराधा नागवडे यांच्या राजकीय मैदानाची आखणी पूर्ण करण्याकडे कल दिलेला दिसून येत आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ज्या राहुल जगताप यांना आमदार करण्यासाठी नागवडे गटाने साथ दिली. त्यांनी व तसेच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मदत करूनही आमदार बबनराव पाचपुते यांनी राजेंद्र नागवडे यांच्या ताब्यातील कारखान्यात सत्तांतर करण्यासाठी विरोधकांना रसद पुरवली, असा आरोप नागवडे गटाचे कार्यकर्ते करत आहेत. हीच खंत मनात धरून नागवडे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत राजंेद्र नागवडे यांनी सवतासुभा मांडण्याचे ठरवले आहे. अनुराधा नागवडे यांना मैदानात उतरवणार असल्याचे अनेकवेळा सांगितले.

अनुराधा नागवडे या गेल्या दहा वर्षांपासून जनसंपर्कात असल्याने त्यांनाही आमदारकी खुणावत आहे. महिलांमध्ये असलेले संघटन, स्वभावातील गोडवा या त्यांच्या जमेच्या बाजू असल्या तरी आजवर नागवडे कुटुंबियांना युवकांमध्ये “क्रेझ’ तयार करणारा चेहरा पुढे करता आलेला नाही, ही वस्तुस्थिती असल्याने ते पिछाडीवर पडत आले आहेत.

दीपक नागवडे यांची युवकांसह अबालवृद्धांमध्ये सुद्धा कायम चर्चा असते. पण आपल्याला राजकारणात उतरायचेच नाही, हा त्यांचा पवित्रा नागवडे गटाला कायम खंतावणारा आहे. पण याच दीपक नागवडे यांच्या तालमीत तयार होत असलेल्या आदेश नागवडे यांचा राजकीय इंटरेस्ट नागवडे गटाला उत्साह देणारा आहे. ही खेळी नागवडे गटात उत्साह पेरणारी आहे.

...तर लिंपणगाव गटातून उमेदवारी?
आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर नव्याने पुनर्गठीत झालेला लिंपणगाव गट सर्वसाधारण जागेसाठी खुला असणार आहे. या गटातून अनुराधा नागवडे उमेदवारी करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत असली तरी त्या स्वतः मात्र जिल्हा परिषदेसाठी इच्छुक नसल्याचे जाणवत आहे. त्यामुळे ऐनवेळी या गटातून आदेश नागवडे यांना उमेदवारी देऊन राजेंद्र नागवडे आपला हुकमी एक्का तालुक्याच्या राजकारणात सक्रिय करू शकतात अशी चर्चा आहे.

बातम्या आणखी आहेत...