आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्देश:शाळा इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश कागदावरच

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहरातील शाळांच्या धोकादायक इमारतींचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. महापालिका प्रशासनाने शाळांच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल सादर करण्याचे निर्देश यापूर्वीच दिलेले होते. मात्र, महापालिकेकडे अद्याप कोणतेही अहवाल सादर झाले नसल्याचे समोर आले आहे. महापालिकेलाही याचा विसर पडला आहे.

नगर तालुक्यातील निंबोडी येथील शाळेची इमारत पडून जीवितहानी झाल्याची घटना काही वर्षांपूर्वी घडली होती. त्यानंतर जिल्हाभरातील सर्व शाळांच्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. नगर शहरातही महापालिकेने शाळांच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, अद्यापपर्यंत असे कोणतेही अहवाल महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे सादर झाल्याचे ऐकिवात नाही. शहरातील सर्व शाळांच्या इमारतींबाबत महापालिकेने सर्वेक्षण करून जुन्या इमारतींमध्ये सुरू असलेल्या शाळांबाबत गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...