आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:स्वयंभू ट्रान्सपोर्ट विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश ; शिवसेना उपजिल्हाप्रमुख जाधव यांच्या याचिकेवर न्यायालयाचा निकाल

नगर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील कचरा संकलन व वाहतुकीसाठी मनपाने ठेका दिलेल्या स्वयंभू ट्रान्सपोर्ट विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करून चौकशीचे आदेश जिल्हा न्यायालयाने दिले. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी दाखल केलेल्या याचिकेवर प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी हा निकाल दिला. कोरोना काळात केलेल्या कचरा संकलनाची वाढीव बिले स्वयंभू ट्रान्सपोर्टने दिल्याची तक्रार जाधव यांनी मनपाकडे केली होती. मनपाने यासंदर्भात कारवाई न केल्याने त्यांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यांनी ही याचिका फेटाळली होती. त्यानंतर जाधव यांनी फेरविचार याचिका दाखल केली होती. स्वयंभू ट्रान्सपोर्ट, तत्कालीन आयुक्त श्रीकांत मायकलवार, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी जाधव यांनी केली होती. त्यावर जिल्हा न्यायाधीश यार्लगड्डा यांनी निकाल दिला. स्वयंभू ट्रान्सपोर्टने बिले सादर करताना दुचाकींचे नंबर असलेल्या गाड्यांची बिले सादर केल्याचे पुरावे जाधव यांनी सादर केले होते. या आधारावर न्यायालयाने स्वयंभु ट्रान्सपोर्ट विरोधात गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश दिले. जाधव यांच्यावतीने अॅड. अिभजित पुप्पाल यांनी काम पाहिले.

बोगस बिले दाखवून महानगरपालिकेची फसवणूक ^ सन २०२० पासून आजतागायत अशाच प्रकारे चुकीची व बोगस बिले दाखवून मनपाची फसवणूक केली जात आहे. अधिकाऱ्यांच्या संगनमताने शिवाय हा प्रकार शक्य नाही. त्यामुळे तत्कालीन अधिकाऱ्यांसह आत्ताच्या अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल होण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.'' गिरीश जाधव, उपजिल्हा प्रमुख, शिवसेना.

बातम्या आणखी आहेत...