आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष सन्मान कार्यक्रम:कर्मचाऱ्यांच्या साहसी योगदानाची नोंद संस्था घेते : नवले

अकोले3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनव शिक्षण संस्थेतील कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी कार्यरत कर्मचाऱ्यांमधील साहसाच्या योगदानाची नोंद अभिनव शिक्षण संस्थेच्या इतिहासात घेतली जाईल, असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव नवले यांनी केले.अभिनव शिक्षण संस्थेतील साहसी कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान कार्यक्रमात मार्गदर्शन करताना नवले बोलत होते. अभिनव शिक्षण संस्थेत काम करताना अकस्मात निर्माण झालेल्या आपत्ती काळात आपल्या जीवाची पर्वा न करताच जीव धोक्यात घालून संकट परतवून लावण्याचे धारिष्ट दाखवलेले परिसर विकास अधिकारी संजय जाधव, शिपाई देविदास काळे, स्कूल बसचालक भाऊराव भांगरे या कर्मचाऱ्यांनी साहसी काम करीत इतरांचे प्राण वाचविले. त्या साहसीवीरांचा विशेष सन्मान अभिनव शिक्षण संस्थेतील संकुलात करण्यात आला.

कोरोना काळात विक्रमशीला इमारतीस लागलेली आग विझवण्यासाठी अभिनव शिक्षण संस्थेचे परिसर विकास अधिकारी संजय जाधव आणि देविदास काळे यांनी प्रसंगावधान दाखवून कौतुकास्पद काम केले. स्बस्कूल चालक भाऊराव भांगरे यांनी बस चालवताना अचानक इंजिनाचे जवळून अंगावर चढलेला साप बघून विचलित न होता बस रोडच्या कडेला सुरक्षित उभी करून अपघात टाळला. या साहसी कर्मचाऱ्यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव नवले व कार्यकारिणी सदस्य डॉ. जयश्री देशमुख यांच्या हस्ते सन्मानपत्र देवून गौरवण्यात आले.

डॉ. जयश्री देशमुख म्हणाल्या, सर्वांनी जीवनात मानवता धर्म जोपासून आपल्या जगण्याच्या मार्गावर अंगीकार करावा, असा संदेश दिला. या प्रसंगी प्राचार्या अल्फोन्सा डी., प्राचार्या अपर्णा श्रीवास्तव, प्राचार्या जेनी प्रसाद, प्राचार्या पराड, राधिका नवले, प्राचार्या कुसुम वाकचौरे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...