आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीजदरवाढीची भिती:खासगी कंपनीला वीजवितरण परवाना देण्यास संघटनेचा विरोध

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील ठाणे व नवी मुंबई परिसरातील महावितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रात खासगी कंपनिला समांतर परवानगी देण्यास महाराष्ट्र वीज कर्मचारी, अधिकारी अभियंता संघर्ष समितीने विरोध दर्शवला आहे. तसेच वीजदरवाढीची फटका बसण्याची भिती व्यक्त केली आहे.

संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारने वेळोवेळी कोट्यवधी रूपये खर्च करून लाखो ग्राहकांना वीज पुरवठा देण्यासाठी हजारो रोहित्र पोल, उपकेंद्र उभारण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्रात जनतेला वीजपुरवठा होऊ शकतो. नैसर्गीक संकटे, महापूर, भुकंप, चक्रीवादळे आदी आपत्ती कालावधीत जिवावर उदार होऊन कर्मचारी काम करत आहेत.

ठाणे, नवीमुंबई, उरण, पनवेल, तळोजा विभागासाठी महाराष्ट्र राज्य वीज नियमाक आयोगाकडे एका कंपनिने समांतर परवानगीसाठी अर्ज केला आहे. जर ही परवानगी दिली, तर राज्यात वीज उद्योगावर परिणाम होईल. वीज ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या शेतीपंपासह विविध घटकाला कमी दराने वीज देण्यात येते.

जर हे ग्राहक महावितरण कंपनिकडून खासजगी भांडवलदाराकडे गेले, तर वीज दरवाढीचा फटका बसू शकतो, धास्तीही व्यक्त केली. वांबोरी उपकेंद्रातील कर्मचारी सचिन सुडके, विकास मोहिते, विजय पवार, प्रवीण पटारे, तनवीर शेख आदींनी या निवेदनाच्या प्रति परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांना वितरीत केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...