आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. शरद पवार यांच्या वाढदिवस:कृतज्ञता सप्ताहाच्या निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

श्रीगोंदे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार डॉ. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दि. ६ ते १२ डिसेंबर या कालावधीत कृतज्ञता सप्ताह साजरा केला जातो. यानिमित्त रयत शिक्षण संस्थेचे, महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले. जिल्हा रुग्णालय, एचडीएफसी बँक, श्रीगोंदे आणि महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, विद्यार्थी कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन केले होते. उद्घाटन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे व विकास समितीचे सदस्य बाबासाहेब भोस यांच्या हस्ते झाले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के, जिल्हा रुग्णालयाचे डॉ. रोहन जाधव, डॉ. सविता दिवेकर, डॉ. निकिता गर्जे, उपप्राचार्य डॉ. महादेव जरे, एचडीएफसी बँकेचे संतोष गोल्हार, विकास बोरुडे, डॉ. प्रकाश साळवे, शहाजी मखरे, डॉ. सुदाम भुजबळ, रमेश थोरात, कर्नल रत्नाकर झिटे यावेळी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनचे स्वयंसेवक, अध्यापक, विद्यार्थी यांनी यावेळी रक्तदान केले.

बातम्या आणखी आहेत...