आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट स्पर्धा:एमआयडीसीच्या जिमखाना मैदानावर पाच दिवसीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमआयडीसीच्या जिमखाना मैदानावर १४ ते १८ डिसेंबर या कालावधीत अंबिका उद्योग समूह आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा होणार आहे. उद्योजकांच्या पुढाकाराने क्रिकेट संघांना व खेळाडूंना भरघोस रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. एमआयडीसी जिमखाना मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे. सहभागी होण्यासाठी संघांकडून नाममात्र शुल्क आकारले जाईल. सामना सहा षटकांचा असेल. विजेत्यांना रोख पारितोषिक देण्यात येणार असून, प्रथम विजेत्या संघास रोख पारितोषिक दिले जातील. याशिवाय वैयक्तिक उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक व खेळाडूस प्रत्येकी बक्षिस दिले जाईल.

स्पर्धेच्या नियोजनासाठी बाळासाहेब मोरे, विजय वाकळे, डॉ. रवींद्र पगारे, डॉ. सचिन दरंदले, नवनाथ कातोरे, डॉ. प्रशांत सिनारे, सुभाषमहाराज कातोरे, गोपाल गोरे, ऋषिकेश भांडुळे, धिरज सिंग, अनिल सोनवणे, अतुल पगारे, हॉटेल अनिकेत, प्रितम सुबे, कैलास रासकर, संतोष उगले, संभाजी खोसे, शरद महापुरे, केशव नागरगोजे, बाळासाहेब बडे, कुंडलिक कातोरे, संजय बडे, अंकुश बडे, विनायक भोर, सुनील खामनेकर, विक्रम बन्सल, दत्ताभाऊ काचोळे, सागर आंबले, महेश वाकळे, संग्राम खिलारी, हेमंत खत्री, राहुल कातोरे, प्रयत्नशील आहेत.

बातम्या आणखी आहेत...