आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशोधन:मानवलोक समाजकार्य महाविद्यालयात सात सप्टेंबर रोजी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

अंबाजोगाई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष व डॉ. द्वारकादासजी लोहिया (बाबुजी) यांच्या जन्मदिनानिमित्त मानवलोक समाजकार्य महाविद्यालय अंबाजोगाई येथे ७ सप्टेंबर २०२२ रोजी ‘छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांचे समाज विकासातील योगदान ’ या विषयावर एक दिवशीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

या परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग सदस्य प्रा. हरी नरके यांच्या हस्ते होणार आहे. या परिषदेमध्ये सामाजिक कार्यकर्ते प्रा. सुभाष वारे, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नरेंद्र काळे, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवदास सिरसाठ हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेचे उपविषय ‘राजर्षि शाहु महाराजांचे शैक्षणिक विकासातील योगदान’, ‘राजर्षि शाहु महाराजांचे कृषि व सिंचन क्षेत्रातील योगदान’, ‘राजर्षी शाहू महाराजांचे वंचित घटकांच्या पुनरूत्थानातील योगदान’, ‘राजर्षि शाहु महाराजांचे सामाजिक न्यायाच्या स्थापनेतील योगदान’, ‘राजर्षि शाहु महाराजांची राष्ट्र बांधणीतील राजकीय दुरदृष्टी’, ‘राजर्षि शाहु महाराजांचे कला, संस्कृती, संगीतक्षेत्र विकासातील योगदान’ हे आहेत. शोधनिबंध शब्द मर्यादा अडीच ते तीन हजार असावी.

लेख manavlok1999@gmail.com या ईमेलवर पाठवावेत. प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी व समाजकार्यकर्ते यांनी राष्ट्रीय परीषदेसाठी ३० ऑगस्ट २०२२ पर्यंत संशोधन पेपर पाठवावेत, असे आवाहन प्राचार्य डॉ. प्रकाश जाधव, प्रा. सुकेशिनी जोगदंड यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...