आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृत महोत्सव विशेष:पेमराज सारडा महाविद्यालयात ‘ये भारत की कहानी है !’ पथनाट्याचे आयोजन; विद्यार्थी सांगणार भारताचा 75 वर्षाचा इतिहास

अहमदनगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेमराज सारडा महाविद्यालयात 12 वीच्या विद्यार्थ्यांनी अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘ये भारत की कहानी है !’ हे पथनाट्य बसवले आहे. यात 15 ऑगस्ट 1947 पासून ते आजपर्यंत भारतात घडलेल्या काही प्रमुख घटना आणि व्यक्तींचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला आहे.

या पथनाट्याचा शुभारंभ रा. स्व. संघाचे प्रांत संपर्क प्रमुख रवींद्र मुळे यांच्या उपस्थितीत सारडा महाविद्यालयात करण्यात आला. शहरात प्रमुख चौकांमध्ये या पथ नाट्याचे सादरीकरण होणार आहे.

विविध उपक्रमांचे आयोजन

पेमराज सारडा महाविद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात ‘भारत की कहानी है |’ हे पथनाट्य महाविद्यालया मधील विद्यार्थ्यांनी बसवले आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक, मानद सचिव संजय जोशी, कार्याध्यक्ष अ‍ॅड. अनंत फडणीस, ज्येष्ठ मार्गदर्शक ब्रिजलाल सारडा, माजी कार्याध्यक्ष अजित बोरा, पेमराज सारडा कॉलेजचे चेअरमन सुमतीलाल कोठारी, रणजीत श्रीगोड, अनंत देसाई, अनिल देशपांडे, ज्योती कुलकर्णी, प्राचार्य डॉ.राजेंद्र शिंदे आदींसह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

देशभक्तीचे आवर्तन पाहण्याची संधी

रवींद्र मुळे म्हणाले, तिरंगा झेंडा सर्वत्र फडकल्याने देशभक्तीची लाट देशात आली आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी येथे सादर केलेल्या पथनाट्या मधून देशभक्तीचे आवर्तन पाहण्याची संधी मला मिळाली आहे. पथनाट्याचे लेखन हे प्रेरणादायी आहे. हे पथनाट्य पाहणाऱ्याच्या मनात नक्कीच देशभक्ती जागृत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

पथनाट्यातून देशभक्तीचा संदेश

प्रास्ताविकात सुमतिलाल कोठारी म्हणाले, पेमराज सारडा महाविद्यालय राष्ट्रभक्तीने प्रेरित होवून ज्ञानदान करत आहे. पथनाट्य हे जनजागृतीचे प्रभावी मध्यम आहे. पण पथनाट्य आता दुर्मिळ होत आहेत. मात्र सारडा महाविद्यालयाने ही परंपरा जपली आहे. विद्यार्थ्यांनी बसवलेले हे पथनाट्य देशभक्तीचा संदेश देत आहे. या पथनाट्याचे शहरत सादरीकरण होणार आहे. सूत्रसंचालन प्रा.प्रसाद बेडेकर यांनी, तर आभार उपप्राचार्या डॉ.मंगला भोसले यांनी मानले. पथनाट्याचे लेखन डॉ. स्मिता भुसे यांनी केले असून दिग्दर्शन प्रसाद बेडेकर यांचे आहे.

बातम्या आणखी आहेत...