आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रीसाईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष तथा आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोपरगाव रन फॉर हेल्थ मॅरेथॉन २०२२ अहिंसा स्तंभ मेन रोड येथे सकाळी ७ वाजता प्रारंभ होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत.
यामध्ये रवींद्र राऊत यांचे वतीने लायन्स मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन, बाळासाहेब रुईकर यांच्या वतीने नायडू गीता प्रशाला विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय वस्तू व खाऊ वाटप, कार्तिक सरदार व शुभम लासुरे शालेय वह्या वाटप नायडू शाळा, रमेश गवळी यांच्यातर्फे मैले पेंटरजवळ गवंडी गल्ली बाजारतळ येथे जंतू नाशक फवारणी, फकीर मुहंमद कुरेशी यांच्या वतीने दुआ मदरसा हायस्कूल खडकी येथील विद्यार्थ्यांना भोजन/वृक्षारोपण, अक्षय पवार व नितीन शेलार यांच्या वतीने खडकी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन, चंद्रशेखर म्हस्के स्कूल यांच्याकडून केबीपी विद्यालयातील विद्यार्थ्यांना बॅग वाटप, माजी नगरसेवक मंदार पहाडे व सुनील शिलेदार यांच्या वतीने बडोदा बँक रोड पंचायत समितीजवळ वृक्षारोपण, नगरपालिका मराठी व उर्दू शाळा माऊली मंगल कार्यालयाजवळील विद्यार्थ्यांना माजी नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद यांच्याकडून वह्या वाटप, माजी नगरसेवक विरेन बोरावके, राजेंद्र वाकचौरे यांच्याकडून लक्ष्मीनगर येथील न. पा. शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप, फकीर महमद कुरेशी, इम्तियाज अत्तार, नवाज कुरेशी व रवी सोनटक्के प्रभाग क्रमांक दावल मलिक बाबा दर्गा सुभाषनगर या ठिकाणी मिठाई वाटप करण्यात येणार आहे. या सर्व सामाजिक उपक्रम प्रसंगी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस कोपरगाव यांच्या वतीने करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.