आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून सायकलचा प्रसार व्हावा यासाठी अहमदनगर सायकलिस्ट ग्रुपच्या वतीने शुक्रवारी सकाळी सात वाजता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा न्यायालय ते मेहेराबाद पर्यंत या सायकल रॅलीला न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली.
आयोजित केलेल्या रॅलीमध्ये अहमदनगर सायकलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर मुळे,उपाध्यक्ष नितीन पाठक, अमोल कुलकर्णी, प्रसाद भंडारी, सुवर्णा मुळे व वैष्णवी पाठक आदी सहभागी झाले होते. या रॅलीचा समारोप जिल्हा न्यायालय येथे सकाळी साडेआठ वाजता झाला.
सायकलचा प्रसार व्हावा हाच मुख्य उद्देश
अहमदनगर सायकलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मुळे म्हणाले, 3 जून ला जागतिक सायकल दिन संपूर्ण जगभर साजरा केला जातो. नियमित सायकलिंग केल्यामुळे आज काल जो स्थूलपणा, जास्त वजन असण्याच्या समस्या जाणवतात. आयुष्य निरोगी राहावे, यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले. कोरोना काळामुळे सायकलिंचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. सायकलिंग मुळे फुफ्फुसे व हृदय यांना बळकटी येते. तसेच पायाचे, गुडघ्याचे सर्व स्नायू बळकट होतात. या असोसिएशनचा उद्देश मुख्यतः अहमदनगर शहर व अहमदनगर जिल्हा यामध्ये सायकलचा प्रसार करणे, जास्तीत जास्त सायकलिस्ट तयार करणे, नवीन नवीन खेळाडू सायकल पटू तयार करणे हा आहे.
सायकलचा प्रसार करण्यासाठी सायकल राईडचे करतो आयोजन
1 जानेवारी - संकल्प राईड महाशिवरात्र राईड, 19 फेब्रुवारी शिवनेरी राईड,
8 मार्च महिला दिनानिमित्त - राईड विथ हर फॉर हर, आळंदी राईड , सायकल दिन, पर्यावरण दिन, अशा विविध प्रसंगानुरूप विविध ठिकाणी राईड अयोजित करत असतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.